Hair wash and hair care : केसांना सिल्की आणि शायनी करण्यासाठी, ही आहे केस धुण्याची योग्य पद्धत!
आज केस धुण्याचा सोपा उपाय जाणून घेणार आहोत . ज्यामुळे केसांना मुलायमता येईल . केस धुण्याच्या पद्धतीमुळे केसांच्या मऊपणातही फरक पडतो. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकधी आपण ओल्या केसांना कंघी करतो तर कधी केसांना बराच वेळ टॉवेल बांधून ठेवतो. या सर्व गोष्टी केस खराब करतात आणि केसांना कोरडेपणा आणतात. चला तर मग जाणून घेऊया हेअर वॉश आणि केसांची निगा कशी करावी. [Photo Credit : Pexel.com]
केस विंचरने : केस धुण्यापूर्वी नीट कंघी करा. केस विंचरताना हे लक्षात ठेवा की कंगव्याला दाट दात असावेत . केस धुण्याआधी कंघी केल्यास केसांतील गुंता निघेल आणि सहज धुतले जातील . [Photo Credit : Pexel.com]
केसांना मसाज करा : केसांना शॅम्पू करण्यापूर्वी टाळूला मसाज करा. स्कॅल्पला हलक्या हातांनी मसाज केल्यास रक्ताभिसरण चांगले होईल . 5 ते 10 मिनिटे टाळूची मालिश केल्याने मृत पेशी आणि धूळ निघून जाते . [Photo Credit : Pexel.com]
कोमट पाण्यात केस धुवा : केस शॅम्पू करण्यापूर्वी, कोमट पाण्यात चांगले धुवा . खूप गरम पाण्याने केस धुणे टाळा . गरम पाण्यात केस खराब होतात आणि तुटतात. [Photo Credit : Pexel.com]
शॅम्पू : कोमट पाण्यात केस धुतल्यानंतर हाताच्या तळहातावर एक चतुर्थांश आकाराचे शॅम्पू घ्या. ते पाण्यात मिसळून टाळू आणि केसांना लावा. केसांना शॅम्पूने एक मिनिट मसाज करा आणि साबण तयार करा. [Photo Credit : Pexel.com]
केस धुवा : शॅम्पू केल्यानंतर केस वरपासून खालपर्यंत पाण्याने चांगले धुवा. लक्षात ठेवा की केस व्यवस्थित स्वच्छ केले गेले आहेत आणि केसांमध्ये शॅम्पू शिल्लक राहणार नाही. [Photo Credit : Pexel.com]
केस सुकवा: केसांना कंडिशनिंग करण्यापूर्वी टॉवेलने केस नीट वाळवा. काही वेळ केसांना टॉवेल बांधून ठेवा म्हणजे पाणी चांगले सुकते. [Photo Credit : Pexel.com]
कंडिशनिंग : कंडिशनर किमान ५ मिनिटे केसांना लावून ठेवा . केस धुण्यापूर्वी केसांना थोडा वेळ थंड पाण्यात ठेवा . केस थोडे ओले झाल्यावर दोन्ही हातात कंडिशनर घेऊन हलक्या हातांनी केसांना लावा. कंडिशनर टाळूवर येणार नाही याची काळजी घ्या. यामुळे केस सिल्की होतील . अशाप्रकारे कंडिशन केल्यास केस मऊ होतील आणि चमकदारही होतील. [Photo Credit : Pexel.com]
या पद्धतीने केस धुतल्याने त्याचा नक्कीच तुमच्या केसांना फायदा होईल . टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]