Wedding Look Tips : लग्नात सर्वात सुंदर दिसायचं असेल तर फक्त स्टाईलवरच नाही, तर या गोष्टींवरही लक्ष द्या !
सध्या लग्नसराईचा हंगाम आहे आणि फॅशनच्या बाबतीत 2024 खूप बदलले आहे. मग ते आपल्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नात काय परिधान करायचे हे ठरवणे असो किंवा पाहुण्यांवर सकारात्मक छाप पाडणे असो. (Photo Credit : pexels)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआउटफिट्स खरेदी करण्याचा उद्देश केवळ त्याच्या लूकवर आधारित नसावा, तर त्यात आणखी अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. (Photo Credit : pexels)
पारंपारिक पोशाख परिधान करा : पारंपारिक विणकाम, भरतकामाचा स्पर्श असणारे कपडे निवडा. हस्तकलेच्या साड्या किंवा लेहंगा निवडा कारण ते परिधान करण्यास खूप आरामदायक आणि दिसायला अतिशय सुंदर आहेत, यामध्ये महिला बनारसी सिल्क किंवा पश्मिना काश्मिरी सिल्क साडीलाही पसंती देऊ शकतात. जे लग्नसमारंभ, सणासुदीत घालणे चांगले. (Photo Credit : pexels)
रंगांची निवड : फॅशननुसार ज्वेल टोन, पेस्टल आणि ग्रेडिएंट, मरून, ब्लू आणि ग्रीन अशा वेगवेगळ्या छटांचे प्रयोग तुम्ही करू शकता. तसेच त्यांच्या जुळण्याकडेही थोडं लक्ष देण्याची गरज आहे.(Photo Credit : pexels)
एक्सेसरीज : आपल्या आउटफिट्सशी जुळणारे दागिने निवडा. इयररिंग्सपासून ते इतर सर्व दागिन्यांपर्यंत तुमच्या कपड्यांशी जुळतात की नाही याची खात्री करून घ्यावी लागते. तसेच त्यांना आउटफिट्ससोबत समतोल साधण्यावर भर द्या. म्हणजे आउटफिट जड असेल तर एक्सेसरीज थोडी हलकी ठेवू शकतात. (Photo Credit : pexels)
पर्यावरणपूरक कपडे : काळ आणि ऋतूनुसार पर्यावरण जागृतीच्या हेतूने आजकाल फॅशनमध्ये लिनन, जूट, बांबू सिल्क अशा परिस्थितीजन्य कापडांना पसंती दिली जात असून फॅशन तसेच पर्यावरणाला अनुकूल अशाच पोशाखांचा अवलंब करण्याचा प्रयत्न आपणही केला पाहिजे.(Photo Credit : pexels)
ट्रेल स्टाईलचा प्रयोग करा : आजकाल चांगल्या दर्जाचे ट्रेल्स असलेले अनारकली सूट किंवा लेहंगा एक वेगळा लूक देतात आणि त्यात तुमचं सौंदर्य फुलतं.(Photo Credit : pexels)
पँटसोबत पॉवर प्ले : जर तुम्हाला पारंपारिक कपडे घालायचे नसतील तर तुम्ही हे सोडून पॉवर पॅक्ड पॅंट स्टाईल निवडू शकता. महिला शरारा , प्लाझो आणि पुरुष कुर्त्यासोबत धोतर घालू शकतात. ही परंपरा आणि आधुनिकतेचे मिश्रण आकर्षक वाटते.(Photo Credit : pexels)
जागा लक्षात ठेवा : जागेनुसार आपला पोशाख निवडा. जर तुम्ही एखाद्या लग्नाला जात असाल जिथे लोकेशन भव्य असेल तर गोटा-पट्टी लेहंगा, कांजीवरम साडी हे उत्तम पर्याय आहेत. तर समुद्रकिनाऱ्यावरील लग्नासाठी हलके कपडे निवडावेत. (Photo Credit : pexels)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels)