Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parenting Tips : मुलं लाडाने अति हट्टी झाले आहे? असा करा हट्टीपणा कमी!
चला तुम्हाला अशा टिप्स सांगतो,ज्यामुळे तुमचे मुलं हट्टीपणा कमी करेल आणि तुम्हाला मुलाचे योग्य संगोपन केल्याचे समाधान मिळेल. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर मूल हट्टी आणि रागावले असेल तर त्यांना कधीही शिवीगाळ करण्याचा किंवा मारहाण करण्याचा प्रयत्न करू नये.यामुळे त्यांना नैराश्य येऊ लागते आणि त्यांच्यात नकारात्मकताही येऊ लागते. [Photo Credit : Pexel.com]
अशा परिस्थितीत अनेक वेळा मुले चुकीची पावले उचलतात.अशा परिस्थितीत मूल जिद्दी असेल तर त्याला प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. [Photo Credit : Pexel.com]
मुलांसाठी वेळ काढा : युनिसेफने मुलांच्या वर्तनावर संशोधन केले होते. मुलासाठी वेळ काढला नाही तर अशी मुले हट्टी होतात, हे उघड झाले. [Photo Credit : Pexel.com]
हळुहळु त्यांच्या सवयी इतक्या बिघडतात की ते वाईट वागू लागतात.अशा परिस्थितीत पालकांनी मुलांसाठी वेळ काढून त्यांचे गांभीर्याने ऐकले पाहिजे.[Photo Credit : Pexel.com]
चांगल्या कामाची स्तुती जरूर करा: जवळपास सर्वच पालक आपल्या मुलांना चुकीचे काम केल्याने फटकारतात,पण जेव्हा मूल कोणतेही चांगले काम करते तेव्हा त्याची स्तुती नक्कीच करा. [Photo Credit : Pexel.com]
मुलाच्या चांगल्या सवयी अनेक लोकांसमोर सांगण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे मुलाच्या मनात सकारात्मकता वाढते.हे पाऊल मुलांना प्रेरित करते,ज्याच्या मदतीने ते वाईट सवयी सोडण्याचा प्रयत्न करतात. [Photo Credit : Pexel.com]
तुमच्या मुलाला असे मार्गदर्शन करा: मुले मनाने खूप निष्पाप असतात. निरागसतेमुळे ते अनेकदा काहीतरी करत राहतात.या काळात त्यांच्याकडून काही चुकले किंवा ते जे काम करणार आहेत, त्यांना प्रेमाने समजावून सांगा. [Photo Credit : Pexel.com]
मुलांना त्यांच्यासाठी काय योग्य आणि काय चूक ते त्यांना सांगा. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]