Home Loan : तुम्ही स्वतःचं घर विकत घेण्याचा विचार करत आहात का? गृहकर्जाबाबत या गोष्टी लक्षात ठेवा !
रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, जानेवारी-मार्च दरम्यान घरांच्या किमती गेल्या 4 वर्षांत सर्वाधिक वाढल्या आहेत. या काळात घरांच्या किमतीत4.46 टक्क्यांनी वाढ झाली आहे.(Photo Credit : pexels)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइतकंच नाही तर घरांच्या महागड्या किमतींचा हा ट्रेंड यापुढेही कायम राहणार आहे. घर घेण्यासाठी लोक गृहकर्जाचा आधार घेत आहेत.(Photo Credit : pexels)
बँकांच्या एकूण कर्जात गृहकर्जाचा वाटा 11 वर्षांपूर्वी 8.6 टक्के होता, तो आता 14 टक्क्यांवर गेला आहे. ज्यावरून असे दिसून येते की लोक घर खरेदी करण्यासाठी गृहकर्जाच्या पर्यायाकडे जात आहेत.(Photo Credit : pexels)
अशापरिस्थितीत जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर होम लोनशी संबंधित काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.(Photo Credit : pexels)
जर तुमचा क्रेडिट स्कोअर 750-800 च्या दरम्यान असेल तर तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करू शकता. कारण, या क्रेडिट स्कोअरमुळे तुम्हाला आकर्षक दरात गृहकर्ज मिळू शकते.(Photo Credit : pexels)
जर तुमच्यावर पर्सनल किंवा ऑटो लोनसारखी देणी नसतील तर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करू शकता. गृहकर्ज घेताना तुम्हाला जास्त ईएमआयचा बोजा सहन करावा लागणार आहे.(Photo Credit : pexels)
जर तुमच्याकडे डाऊन पेमेंटसाठी 20-30 टक्के कॅश असेल तर तुम्ही घर खरेदी करण्यास तयार आहात. अशा परिस्थितीत तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार नक्की करू शकता.(Photo Credit : pexels)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels)