Health Tips : चेहऱ्यावरील पिंपल्समुळे त्रासला आहात? पिंपल्स घालवण्यासाठी आहारात समाविष्ट करा 'हे' पदार्थ...
चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी बीट किंवा बिटाचा रस उपयुक्त ठरतो. बिटात साखरेचे प्रमाण कमी असल्याने ते उपयुक्त ठरते. बिटाचा रस दोन महिन्यांपर्यंत प्यायल्याने चेहऱ्यावरील मुरुम, डाग, सुरकुत्या नाहीश्या होतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलिंबाचा रस सायट्रिक ऍसिडच्या मदतीने यकृत साफ करण्यास आणि रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी मदत करतो. लिंबामुळे चेहऱ्यावरील मुरुम दूर होतात आणि तुमची त्वचा ताजी आणि चमकदार राहते.
भाज्यांप्रमाणे, तुम्ही जितके जास्त अँटिऑक्सिडंट्स खाऊ शकता तितके चांगले. विशेषत: तुम्ही रास्पबेरीचा वापर करु शकता. रास्पबेरी हे त्वचेसाठी आरोग्यदायी असतात, कारण त्यात जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर असतात. यामध्ये भरपूर प्रमाणात फायटोकेमिकल्स असतात जे त्वचेचे संरक्षण करतात.
पाण्यामुळे शरीरात पोषण आणि ऑक्सिजन वाहून नेले जाते. पाणी शरीर स्वच्छ ठेवते आणि मुरुमांशी लढण्यासाठी मदत करते.
पिंपल्स आणि त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी कलिंगड खूप उपयुक्त आहे. यामध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. कलिंगड किवा कलिंगडाच्या ज्यूसचे सेवन केल्यास त्वचा ताजी, तेजस्वी आणि हायड्रेटेड राहते. हे पिंपल्स रोखण्यात मदत करते आणि पिंपल्सचे डाग दूर करते.
निरोगी त्वचा ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे हा सर्वोत्तम उपाय आहे. डेअरी उत्पादनांमध्ये व्हिटॅमिन ए असते, जे निरोगी त्वचेचा सर्वात महत्वाचा घटक आहे. आहारात सर्व प्रकारच्या पालेभाज्या, अंडी, मांस आणि दूधाचा समावेश असावा. अशा प्रकारचा संतुलित, सकस आहार पिंपल्सशी लढण्यात मदत करतो. संतुलित आहार हार्मोन पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
दह्यामध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत, म्हणून ते त्वचा स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. दुग्धजन्य पदार्थ मुरुमांशी लढण्यास फायदेशीर ठरतात. जेवणाच्या शेवटी दही खाणे त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
पिंपल्स दूर करण्यासाठी सफरचंद फायदेशीर ठरते. सफरचंदात भरपूर पेक्टिन असते आणि ते मुरुमांशी लढण्यास महत्त्वाचे आहे.
मुळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ही पोषक तत्त्वे आपल्या चेहऱ्यासाठी आवश्यक असतात. मुळा चेहऱ्यावर तेज आणते आणि स्किन डॅमेज, ड्रायनेस आणि पिंपल्सशी लढण्यात मदत करते.
नियमितपणे अक्रोड खाल्ल्याने त्वचेचा नितळपणा आणि मुलायमपणा सुधारण्यास मदत होते. अक्रोडाच्या तेलामध्ये लिनोलिक ऍसिड असते, जे त्वचेची रचना टिकवून ठेवण्यास मदत करते. अक्रोड खाल्ल्याने वारंवार पिंपल्स येणे बंद होते.
डार्क चॉकलेट हे सर्वात आरोग्यदायी प्रकारचे चॉकलेट आहे, जो तुम्ही खाऊ शकता. (त्यात साखरेचे प्रमाण तुलनेने फारच कमी आहे) त्यात मुरुमांशी लढणारे आणखी एक पोषक तत्व झिंक देखील असते.