Shivaji Park Pollution : शिवाजी पार्कवर पुन्हा मातीचे ढिगारे, परिसरातील धुळीचं साम्राज्य कसं रोखणार?
मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क परिसरात पुन्हा मातीचे ढिगारे पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे शिवाजी पार्क परिसरातील धुळीचा साम्राज्य कसं रोखणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
1 मे महाराष्ट्र दिन कार्यक्रमाच्या पोलीस परेडसाठी पुन्हा एकदा शिवाजी पार्कवर मातीचे ढिगारे दिसत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मातीचे ढिगारे टाकले असल्याचं स्पष्टीकरण बीएमसीने दिलं आहे.
शिवाजी पार्क परिसरातील धुळीचं प्रदूषण कशाप्रकारे रोखता येईल यासंदर्भात 15 दिवसांपूर्वीच बैठक झाली
या बैठकीला स्थानिक, बीएमसी अधिकारी, खासदार आणि आमदारांची उपस्थिती होती.
मात्र या बैठकीनंतरही याबाबत कुठलीही पावलं उचलली जात नसल्याचं या दृश्यावरुन दिसून येत आहे.
ही माती पुन्हा शिवाजी पार्कवर टाकल्याने धुळीचे कण हवेत पसरुन मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होणार असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे
या प्रदूषणामुळे शिवाजी पार्क दादर परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे.