Agriculture News : मिरचीच्या दरात वाढ, अवकाळी पावसामुळं आवक घटली
राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) शेती पिकांना मोठा फटका बसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहेत. भंडारा (Bhandara) जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसाचा मोठा फटका लाल मिरचीला (Chili) बसला आहे
मसाल्यामध्ये सर्वात महत्वाची असलेली लाल मिरचीला अवकाळी पावसामुळं बुरशी लागत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
कोरोना काळात मिरचीच्या खरेदीमध्ये घट झाली होती. त्यामुळं यंदा भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर, लाखनी या तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मिरचीतून अनेक अपेक्षा होत्या.
अवकाळी पावसामुळं मिरची पिकास चांगलाच मोठा फटका बसला आहे. जेवणाची चव वाढवणाऱ्या लाल मिरचीचे दरही वाढले आहेत.
एकीकडं वाढती महागाई आणि दिवसेंदिवस भाज्या आणि जीवनावश्यक वस्तू महाग झाल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडत आहे.
लाल मिरची महाग झाली आहे. दिवाळीनंतर मिरचीची आवक वाढायला सुरुवात होते. मात्र, यंदा पावसामुळे अनेक पिकांचं नुकसानच झालं.
दिवाळीनंतर चांगल्या मिरची बाजारपेठेत येत असल्यानं त्या वर्षभरासाठी घेऊन ठेवाव्यात असा मानस असतो. मात्र, यंदा हीच आवक घटल्यानं मिरचीचे दर गगनाला भिडले आहेत.
वर्षभरासाठी मिरच्या घेताना जरा विचार करावा लागणार आहे. कारण बाजारपेठेत मागणी तेवढीच आहे.
आवक घटल्याने आता किंमती वाढल्या आहेत. यावेळी मिरचीचे भाव दुप्पट वाढले आहेत.
भंडारा (Bhandara) जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसाचा मोठा फटका लाल मिरचीला (Chili) बसला आहे.