Nutrition Tips For Students : परीक्षेपूर्वी मुलांना 'हे' 5 सुपर फूड खाऊ द्या, मुलांची एकाग्रता वाढण्याकरता होईल मदत
आजच्या काळात लहानपणापासूनच मुलांवर अभ्यासाचे खूप दडपण असते. शाळा असो की शिकवणी, प्रत्येक परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचे दडपण मुलांवर असते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचांगले गुण पाहिजेत म्हणून मुले अभ्यास खूप करतात.मात्र त्यावेळी जेवणाकडे मोठ्या प्रमणात दूर्लक्ष करतात. ज्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो.
वेळेवर जेवण न केल्याने त्यांची शारिरीक आणि मानसिक प्रगती होत नाही. परिक्षा जवळ आली म्हणून मुलांच्या खाण्या-पिण्याकडे दूर्लक्ष करणे चूकीचे ठरू शकते.
मुलांनी खाल्लेले अन्न त्यांच्या उर्जेची पातळी आणि एकूण आरोग्यावर थेट परिणाम करते. पालकांनी आपल्या मुलांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून मुलांना त्यांच्या शरीरासाठी आवश्यक ते पोषक घटक मिळतील.
मुलांचे आरोग्य राखण्यासाठी चांगला आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. मुलांना सकाळचा सकस नाश्ता, दुपारच्या जेवणासोबत दूध आणि फळे यांसारखे पौष्टिक पदार्थांनी युक्त नाश्ता द्यावा. दुपारच्या जेवनात पोळी - भाजी, वरण असे सगळे त्यांना द्यावे.
ओमेगा-3 फॅटी अॅसिडने युक्त असलेले पदार्थ मुलांना खायला द्यावेत. ज्यामुळे त्यांची बुद्धी चांगले काम करू शकेल. मुलं मांसाहार करत असेल तर त्याला मासे खायला द्यावेत.
अँटीऑक्सीडेंट्सने युक्त फळे , भाज्या त्यांना खायला द्या.यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होऊ शकते.
कार्बोहायड्रेट असणारे अन्न देखील मुलांसाठी खूप फायदेशीर असू शकते. तांदूळ, ओट्स सारखे पदार्थ मुलांच्या मेंदूसाठी महत्वाची असतात. त्यामुळे मुलांचा मेंदू तीक्ष्ण होतो.
स्मरणशक्ती वाढवण्याकरता व्हिटामिन देखील महत्वाचे आहे.
रोज भिजवलेले बदाम मुलांना खायला देणे गरजेचे आहे.