Home Remedies for Itching : सतत अंग खाजवत आहे? 'हे' घरगुती उपाय पडतील कामी
खाण्या-पिण्यात काही बदल झाले तर किंवा कोणत्यातरी अॅलर्जीमुळे अचानक खाजायला सुरूवात होते आणि या खाजण्यामुळे अगदी नाकीनऊ येते. तर अनेकदा सतत अंग खाजत असते. अशा वेळी काय करावे लक्षात येत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसतत अंग खाजवत असेल तर त्यामागे अनेक कारणं असू शकतात. याकरता प्रामुख्याने फंगस , बॅक्टेरिया किंवा वेळोवेळी होणारे पित्त.तर काही लोकांच्या ड्राय स्किनमुळे देखील खाज सुटते.
अंगाला खाज सुटण्याचे कारणं जाणून घ्या - ड्राय स्किन , बाहेर फिरताना किडा चावणे , अॅलर्जिक रिअॅक्शन , मेडिकल कंडिशन , औषधांचे साईड ईफेक्ट्स.
जर तुम्ही अंग खाजण्याचा त्रास जास्त होत असेल तर, तुम्ही ओटमीलचा वापर करा. ओटमीलला प्रथम पाण्यात घाला आणि त्या पाण्याने अंघोळ करा.
अँपल व्हिनेगरच्या साहाय्याने देखील तुमचा अंग खाजण्यचा प्रश्न सुटू शकतो. यासाठी अँपल व्हिनेगर पाण्यात मिसळा आणि कापसाच्या मदतीने खाजत असणाऱ्या भागावर लावा. व्हिनेगरमध्ये असणारे अॅसिटिक अॅसिड खाज थांबवते.
ज्याठिकणी खाजत आहे त्याठिकाणी अॅलोवेरा जेल किंवा पेट्रोलियम जेली लावावे. यामुळे काही दिवसात खाज दूर होऊ शकते.
खोबरेल तेलात थोडा कापूर मिसळा आणि संपूर्ण शरीरावर लावा. असे काही दिवस केल्यावर, ते प्रभावित भागावर लावा. काही दिवसांनी तुमची खाज सुटते.
बेकिंग सोडा देखील खाज दूर करू शकतो. एक किंवा दोन चमचे बेकिंग सोडा पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि खाज येणाऱ्या भागात लावा. काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवू लागेल.
तसेच टी ट्री आॅईलमध्ये आॅलिव्ह आॅईल किंवा नारळाचे तेल मिसळा आणि खाज सुटणाऱ्या ठिकाणी लावा.
सर्व घरगुती उपाय करून देखील खाज कमी होत नसेल तर मात्र डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.