Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
First Date Outfit Tips : पहिल्या डेटला जाताना घाला 'हे' कपडे, मिळेल क्लासी आणि परफेक्ट लुक
पहिली डेट, पहिला इंटरवव्ह्यू किंवा पहिली नोकरी नेहमीच खास असते. म्हणून अनेकदा म्हटले जाते की, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. पहिल्या डेटवर तुम्ही जात असाल तर पहिल्यांदा लक्ष जाते ते तुमच्या कपड्यांकडे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशा वेळी तुम्ही ही पहिल्या डेटवर जात असाल तर तुम्ही कसे कपडे घालावेत , काय घालावे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.याने तुम्ही डेटदिवशी खास दिसू शकता.
पहिल्या डेटला नवीन ट्रेंड कोणता आहे हे पाहून कपडे घाला. ही तुमची पहिली डेट असेल तर तुम्ही शक्यतो साधे आणि छान कपडे घालावेत.
फॅशनच्या नावाखाली असे काहीतरी घालू नका ज्यामध्ये आपण स्वत:अस्वस्थ व्हाल. फक्त तेच कपडे घाला ज्याची तुम्हाला सवय आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण नाही.
ठिकाणानुसार कपडे देखील घातले जातात. त्यामुळे तुम्ही तुमच्या पहिल्या डेटला कुठे जात आहात याचाही विचार करा. बार, पब, मूव्ही, पार्क, डिनर याप्रमाणे प्रत्येकासाठी वेगवेगळे कपडे निवडावेत. जर तुम्ही कोट-पँट घालून पार्कमध्ये डेटला गेलात तर ते विचित्र दिसेल.
पहिली डेट आहे त्या विचाराच्या नादात जास्त मेकअप करू नकात. यामुळे तुम्ही विचित्र दिसू शकतात.
जर तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत काय घालावे हे ठरवू शकत नसाल तर जो तुम्ही नेहमी ड्रेस घालता तोच घालून जा.
जर तुम्ही पहिल्या डेटवर जाण्याबद्दल चिंताग्रस्त असाल आणि कपड्यांबाबतीत कम्फर्ट झोनमध्ये राहू इच्छित असाल. तर क्युट टॉप आणि जीन्स वापरून पहा. हा लूक सुंदर तर दिसेलच पण आत्मविश्वासही देईल. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत पिकनिक ते नाईट आऊटपर्यंत सहज जाऊ शकता. हा आउटफिट तुम्हाला कोणतीही मेहनत न करता परफेक्ट लुक देईल.
जर तुम्हाला कपड्यांवर विश्वास असेल, तर रिब्ड क्रॉप टॉपसह मॅचिंग फिटिंग स्कर्ट वापरून पहा. हा लूक सध्या ट्रेंडमध्ये आहे आणि तुम्हाला डेट नाईटसाठी परफेक्ट लुक देईल.
जर तुम्ही बॉलीवूड अॅक्ट्रेसचे चाहते असाल आणि त्यांचे लुक कॉपी करायला आवडत असाल. त्यामुळे फर्स्ट डेट नाईटसाठी तुम्ही जीन्स किंवा लेदर पँट एका शोल्डर टॉपसोबत मॅच करू शकता. हे खूप ट्रेंडी आणि परफेक्ट लुक देईल. याशिवाय तुमचा आत्मविश्वासही कायम राहील.
जर तुम्हाला स्पोर्टी लूक हवा असेल तर या सुंदर लुकसाठी फ्रिल ड्रेससह स्नीकर्स वापरून पहा. हा पोशाख डे डेट आणि कॉफी डेटसाठी योग्य आहे.