नवीन वर्षाचा संकल्प : सूर्यनमस्कार कसे करावेत, जाणून घ्या 12 आसनं!
सूर्यनमस्कार केल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते, सूर्यनमस्काराच्या सर्व स्थितीमध्ये आसन स्थिती कशी करतात ते जाणून घेऊया! (छायाचित्र सौजन्य : प्रियांका ढोले, आंतरराष्ट्रीय योग शिक्षक आणि आहारतज्ञ)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App1) प्रणामआसन : सुरुवातीला सरळ उभं राहावं आणि नमस्कार करावा.
2) हस्तौत्तनासन : मग मागच्या बाजूला वाकावं.
3) हस्तपादासन : त्यानंतर कंबरेतून खाली वाकून दोन्ही हात पायांच्या शेजारी ठेऊन हनुवटी गुडघ्याला लावावी.
4) अश्व संचालनासन : त्यानंतर एक पाय मागे घेऊन, पुढचा पाय गुडघ्यात वाकवून पाठीची कमान करत मागे बघावं.
5) दंडासन : यानंतरच्या स्थितीमध्ये पायाचे चौडे, गुडघे, छाती आणि हनुवटी जमिनीला टेकवावी.
6) अष्टांग नमस्कार : त्यानंतर दोन्ही हातावर शरीराचा भार घेत, पाठीची कमान करत मान ताठ ठेवावी.
7) भुजंगासन : त्यानंतर पुढं सरका आणि छातीला उंचवा जणू फणा काढलेला नाग.
8) पर्वतासन : श्वास सोडत आपली कंबर वरती घ्या.
9) अश्व संचालनासन : त्यानंतर एक पाय मागे घेऊन, पुढचा पाय गुडघ्यात वाकवून पाठीची कमान करा
10) हस्त पादासन : कंबरेतून खाली वाकूत दोन्ही हात पायांच्या शेजारी ठेऊन हनुवटी गुडघ्याला लावावी.
11) हस्तौत्तनासन : मग मागच्या बाजूला वाकावं.
12) ताडासन : सरळ उभं राहून नमस्कार करावा. (छायाचित्र सौजन्य : प्रियांका ढोले, आंतरराष्ट्रीय योग शिक्षक आणि आहारतज्ञ)