आझाद मैदान मोकळं करा, आंदोलनकर्त्यांना BMC चा आदेश
मुंबईत १४४ कलम लागू झाल्यानंतर आझाद मैदानावरील एसटी आंदोलनाला फटका, नियमाप्रमाणे मैदान खाली करण्याच्या पोलिसांच्या सूचना
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसकाळी ५ ते संध्याकाळी ५ पर्यंतच आंदोलन करण्याची परवानगी, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर निर्णय घेण्यात आला आहे. सर्व आंदोलकांकडून मैदान खाली करण्यास सुरुवात, एसटी आंदोलकांकडूनही मैदान खाली .
यापुढे १४४ लागू असेपर्यंत मोजक्याच लोकांसोबत, मोजक्याच वेळेत आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, एसटी आंदोलकांनी ह्या सर्व गोष्टी मान्य करत आपले आंदोलन सुरुच ठेवण्याच्या इशारा दिला आहे. सर्व नियम पाळत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे.
राज्यात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. 31 डिसेंबरपासून राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
मुंबईतही कोरोनाबाधित रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. त्यामुळे राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत.