Home Buying : नवीन वर्षात घर घेताय? मग 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी...
बिल्डरची माहिती मिळवा: कोणत्याही रिअल इस्टेट प्रकल्पात पैसे गुंतवण्यापूर्वी त्या बिल्डरची संपूर्ण माहिती मिळवणे गरजेचे आहे. (Photo Credit : pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघरासंबंधित कायदेशीर कागदपत्रे तपासणे : तुम्ही जी मालमत्ता विकत घेणार आहात त्या मालमत्तेच्या कायदेशीर कागदपत्रांची व्यवस्थित पडताळणी करुन घ्यावी. (Photo Credit : pixabay)
पारदर्शक व्यवहार : घराचे सर्व व्यवहार हे बँकेच्या माध्यमातूनच करणे फायदेशीर ठरते, त्यामुळे आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा पुरावा राहतो. (Photo Credit : pixabay)
प्रॉपर्टी वकिलाची मदत घेणे : घराबाबत सर्व व्यवहार करताना प्रॉपर्टी वकिलाची मदत घेणे गरजेचे असते. ओळखीचा वकिल असेल तर फायदेशीर ठरते. (Photo Credit : pixabay)
बिल्डर रेरामध्ये रजिस्ट्रेशन महत्त्वाचं : घर खरेदी करतेवेळी बिल्डर रेरा अर्थात रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथोरिटीमध्ये नोंदणीकृत आहे की नाही हे आवश्य तपासा हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. RERA मध्ये नोंदणीकृत नसलेले घर खरेदी करू नका. (Photo Credit : pixabay)
वास्तुशास्त्र : वास्तुशास्त्रात घराची दिशा आणि कुठे काय ठेवावे हेही सांगितले जाते जे आपल्या नवीन घरासाठी फायदेशीर ठरते. (Photo Credit : pixabay)
घराची जागा कोणाच्या मालकीची आहे ते तपासणे : तुम्ही जे घर विकत घेणार आहात त्या घराची जमीन कोणाच्या मालकीची आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. याचा प्रॉपर्टीच्या भावावर मोठा परिणाम होतो. तसेच जमीन अनिधिकृत नाही ना याची खात्री पटते. (Photo Credit : pixabay)
EMI बद्दल जाणून घेणे : तुम्ही विकत घेणाऱ्या घरावर EMI मिळेल की नाही ते तपासून घ्या. घर घेण्यापूर्वी गृहकर्जाची संपूर्ण माहिती जाणून घेणे महत्वाचे आहे. (Photo Credit : pixabay)
पायाभूत सुविधा : शाळा, दवाखाना,मॉल, दुकाने, पाणीपुरवठा, वीजपुरवठा इत्यादी गोष्टी योग्य आहेत का ते तपासून घ्या. (Photo Credit : pixabay)
पब्लिक ट्रान्सपोर्ट : सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट. तुमच्या घरापासून पब्लिक ट्रान्सपोर्ट किती दूर आहे हे पाहणे गरजेचे आहे. तुम्ही जिथे घर घेता आहात तिकडे रेल्वे,बस,ऑटो, मेट्रो अशा सार्वजनिक वाहनांची कनेक्टिव्हिटी असणे महत्त्वाचे आहे. (Photo Credit : pixabay)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pixabay)