Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lifestyle News : 'या' लोकांसाठी ओवा खाणं का ठरु शकतं तोट्याचं, सविस्तर जाणून घ्या
ओवा खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण याचे अतिरिक्त सेवन केल्याने काय होऊ शकते हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजास्त प्रमाणात ओवा खाल्ल्याने जुलाब आणि उलट्या सारख्या समस्या देखील होऊ शकतात. त्यामुळे जास्त प्रमाणात ओवा खाऊ नये.
ओव्यामुळे उष्णता जास्त प्रमाणात शरीरामध्ये निर्माण होते.
त्यामुळे ओवा जास्त प्रमाणात खाल्ल्यास गर्भवती स्त्रियांसाठी धोकायदायक ठरु शकतो.
तसेच यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण देखील कमी होते, जे गर्भवती स्त्रियांसाठी चांगले नसते.
ज्या लोकांना त्वचेशी संबंधित आजार आहेत, त्या लोकांनी देखील ओव्याचे अतिरिक्त सेवन करु नये.
जर एखाद्याला जळजळ होणे, अल्सर यांसारख्या समस्या आहेत, त्यांनी देखील ओवा जास्त प्रमाणात खाऊ नये.
त्यामुळे पोटाशी संबंधित आजार उद्भवण्याची शक्यता असते.
तसेच यामध्ये असलेल्या काही रसायनांमुळे रक्तदाबाचा त्रास होण्याची देखील शक्यता असते.