Money Plant Caring Tips : मनी प्लांटची काळजी कशी घ्यावी? फाॅलो करा खास टिप्स
आपल्या घराची आणि अंगणाची शोभा वाढवण्याकरता मनी प्लांटचा वापर केला जातो. असे म्हणले जाते की मनी प्लांट घरात असेल तर भरपूर पैसा घरात खेळतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजकाल प्रत्येक घरात मनी प्लांट लावले जाते. मनी प्लांट आपण घराच्या अंगणात किंवा घराच्या आत कुठेही लावू शकतो. मनी प्लांट करता जास्त उन्हाची गरज नसते. त्यामुळे लक्षात ठेवा की, मनी प्लांटला खूप ऊन येत असेल अशा ठिकाणी ठेवू नका.
मनी प्लांटला जास्त खताची गरज नसते. प्रत्येक महिन्याला या प्लांटकरता खत घालण्याची आवश्यकता नसते.3-4 महिन्यांतून एकदा घातलेले खत मनी प्लांटला पुरेसे होते.
तुम्ही कोणत्या ठिकाणी मनी प्लांट लावले आहे, त्यावरून ठरवावे की त्याला किती पाण्याची गरज आहे. मनी प्लांट तुम्ही कुंडीत लावले असेल तर त्याची वरची माती सुकली असेल तरच मनी प्लांटला पाणी द्यावे. तर तुम्ही मनी प्लांट बाॅटलमध्ये लावले असेल तर 10-15 दिवसाने पाणी बदलावे.
काही वेळेस मनी प्लांटची पाने पिवळी पडतात. अशा वेळी त्यांना जास्त पाणी किंवा जास्त खत घालणे योग्य नाही. पिवळ्या झालेल्या पानांना वेळोवेळी काढत राहणे गरजेचे आहे.
बाॅटलमध्ये मनी प्लांट लावल्यानंतर त्यात तुम्ही एक गोळी एस्प्रीन मिक्स केले तर मनी प्लांट मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
तुम्हाला जर मनी प्लांट बाॅटल मध्ये लावायचे असेल तर प्लास्टिक बाॅटल ऐवजी बिअर किंवा व्हिस्कीच्या बाॅटलचा वापर करा. यामुळे झाडाला आवश्यक असणारी ह्यूमिडिटी मेंटेन राहू शकते. तसेच मनी प्लांटची वाढ देखील चांगली होण्यास मदत होते.
तर मनी प्लांटच्या चांगल्या वाढीकरता त्याची वेळोवेळी कटींग करणे गरजेचे आहे. याच्या वाढलेल्या फांद्या वेळोवेळी कट करणे गरजेचे आहे.
तसेच मनी प्लांटच्या लावलेल्या मातीत हळद घातल्यास मनी प्लांटला हवे असणारे पोषक तत्वे मिळतात आणि वाढ चांगली होते.
मनी प्लांट कोणत्याही ऋतूत तु्म्ही लावू शकता पण शक्यतो हिवाळ्यात लावल्यास मोठे फायदे होऊ शकतात.