तुम्हीही गरम पाण्याने केस धुता का? जाणून घ्या परिणाम...
गरम पाण्याने केस धुतल्याने केसांची मुळे कमकुवत होऊ शकतात. कारण अति गरम पाण्याने केस धुतल्याने केस रुक्ष होतात तसंच केसगळतीची समस्या वाढते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेस कधीही गरम पाण्याने धुवू नयेत. यामुळे केस कोरडे होतात. इतकंच नाही तर गरम पाणी वापरल्याने केसांची छिद्रं कमकुवत होतात. ज्यामुळे तुम्हाला केसांशी संबंधित समस्या येऊ लागतात.
गरम पाण्याने केस धुतल्यास केसांत कोंडा होतो त्यामुळे केस गळण्यास सुरुवात होते.
गरम पाण्याचा वापर केल्याने केसांची चमक नष्ट होते.
अति गरम पाण्याने केस धुतल्याने तुमचे केस पांढरे होऊ शकतात. त्यामुळे गरम पाण्याने केस धुणे टाळा
गरम पाण्याने केस धुतल्याने केसांचे नुकसान होते. जर तुम्हाला थंड पाण्याने आंघोळ करणे शक्य नसेल कोमट पाण्याचा वापर करावा. कोमट पाण्याने आंघोळ करणे हा उत्तम पर्याय आहे.
कोमट पाण्याने केस धुतल्यास केसांची चमक वाढेल, केस गळतीचा त्रास कमी होईल आणि केस तुटणार देखील नाहीत.