Lifestyle: 'या' कारणांमुळे लग्नानंतर प्रत्येक मुलीला येते 'माहेर'ची आठवण
मुलींना माहेरची आठवण येण्याचं पहिलं कारण म्हणजे - घराच्या जबाबदाऱ्या सांभाळणं. अचानक संपूर्ण घराची जबाबदारी अंगावर आल्याने मुलींना माहेरची आठवण यायला लागते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलग्नानंतर प्रत्येक काम काळजीपूर्वक करावं लागतं. लग्नाआधी घरातली सर्व कामं आपले आई-बाबा पार पडतात, परंतु लग्नानंतर एकटीवर जबाबदारी पडल्याने मुलींना माहेरची आठवण येते.
लग्नानंतर सकाळी स्वतःहून उठावं लागतं.
सासरी आईसारखे नखरे झेलणारं कुणी नसतं.
जेवणात काय खाणार? हा प्रश्न पडलेला असतो.
लग्नानंतर मुलींना आईच्या हातच्या जेवणाची आठवण येते.
कधी-कधी घरी गप्पा मारायला कुणी नसल्याने एकटं वाटतं आणि घरची आठवण यायला लागते.
लग्नाआधी आईचं रागवणं आपल्याला आवडत नाही, पण लग्नानंतर मुलींना याच गोष्टीची कमी सर्वात जास्त जाणवते.
लग्न झालं की स्वयंपाकाची जबाबदारी अंगावर पडते आणि स्वयंपाक शिकावा लागतो.
लग्नानंतर दु:ख शेअर करण्यासाठी कुणी नसतं, अशी जाणीव व्हायला लागते आणि माहेरची आठवण यायला लागते.