7 Cancer Test Needs Every Woman : कॅन्सर टाळण्यासाठी प्रत्येक महिलेने कराव्याच या 7 चाचण्या , या चाचण्यांविषयी जाणून घ्या सविस्तर
कर्करोग हा असा आजार आहे की तो लवकर ओळखला तर तो पूर्णपणे टाळता येतो. पण दुर्दैवाने कॅन्सर तपासणीबाबत जनजागृतीचा फार मोठा अभाव आहे. बहुतांश महिलांची कर्करोगाची तपासणी वेळेवर होत नाही, त्यामुळे त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसप्टेंबर महिना स्त्रीरोग कर्करोग जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो. याचाच अर्थ समाज आणि महिलांमध्ये जागरूकता निर्माण झाली तर कर्करोग सहज टाळता येऊ शकतो. यासाठी काही चाचण्या वेळेवर कराव्या लागतात. याच्या मदतीने कर्करोगाच्या प्राथमिक अवस्थेत संबंधित रूग्णाला उपचार मिळू शकतात.
प्रत्येक महिलांनी नियमितपणे स्त्रीरोगविषयक चाचण्या केल्या पाहिजेत. यामुळे कॅन्सर वेळेआधी ओळखला जाईल आणि मग हा आजार सहज टाळता येईल. एक HPV लस देखील आहे जी प्रत्येक स्त्रीने घ्यावी. जाणून घेऊया कोणत्या 7 कॅन्सर चाचण्या आहेत ज्या प्रत्येक महिलेने कराव्यात.
प्रजनन आरोग्य नेहमी सुधारण्यासाठी, प्रत्येक स्त्रीने नियमितपणे पॅप स्मीअर चाचणी केली पाहिजे. 21 ते 65 वर्षे वयोगटातील प्रत्येक महिलेने तीन वर्षांतून एकदा पॅप स्मीअर चाचणी करणे आवश्यक आहे. याच्या मदतीने प्रजनन अवयवातील कर्करोग लवकर ओळखला जाईल.
गर्भाशयाच्या कर्करोगाकरता ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस सर्वात जास्त जबाबदार आहे.या विषाणूच्या हल्ल्यामुळे प्रजनन अवयवांच्या पेशींमध्ये बदल होऊ लागतात. ही चाचणी वयाच्या 25 वर्षांनंतर केली जाते. सामान्यतः HPV चाचणी पॅप स्मीअरसोबत केली जाते. याद्वारे गर्भाशयाचा कर्करोग टाळता येऊ शकतो.
पॅप स्मीअरमध्ये काही समस्या असल्यास डॉक्टर कॉलपोस्कोपी करण्याचा सल्ला देतात. यामध्ये, गर्भाशय आतील गोष्टी अतिशय बारकाईने पाहिल्या जातात ज्यामध्ये कर्करोग असल्यास त्यावर त्वरित उपचार केले जातात.
ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंडद्वारे देखील महिलांच्या शरीराची तपासणी करण्यात येते. महिलांच्या शरीराच्या अनेक भागात कर्करोगाच्या पेशी आढळतात. याद्वारे, अंडाशय आणि गर्भाशयात होणारे धोकादायक कर्करोग ओळखले जातात.
बीआरसीए जेनेटिक टेस्टिंगमध्ये BRCA1 आणि BRCA2 यांची तपासणी केली जाते. हे दोन्ही जीन्स स्तन आणि अंडाशयाच्या कर्करोगासाठी जबाबदार आहेत.
CA-125 रक्त चाचणी 30 वर्षांनंतर केली जाते. रक्तात CA-125 प्रोटीन मोठ्या प्रमाणात वाढल्यास गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका असतो.
भारतात महिलांना होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण सध्या वाढताना दिसून येत आहे. यात महिलांना होणाऱ्या कॅन्सरमध्ये (Cancer In Women) स्तनांचा कॅन्सर, सर्व्हायकल म्हणजेच गर्भाशय मुखाचा कॅन्सर आणि तोंडाचा कॅन्सर प्रामुख्याने दिसून येतात. या व्यतिरिक्त ब्लॅडर कॅन्सर, ब्लड कॅन्सर, कोलन आणि रेक्टल कॅन्सर, किडनी कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, लंग अर्थात फुफ्फुसाचा कॅन्सर, पॅनेक्रॅटिक कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, थॉयरायईड कॅन्सर, मेलेनोमा, ब्रेन कॅन्सर, हेड अँड नेक कॅन्सर, स्किन कॅन्सर हे अन्य काही प्रकार आहेत. या कारणाने वरील सर्व चाचण्या महिलांनी वेळोवेळी करणे गरजेचे आहे.