Pune Ganeshotsav 2023 : भारतीय लष्कराच्या सदर्न कमांड तर्फे 'दगडूशेठ' गणपतीची आरतीच 300 हून अधिक जवान हजर

भारत माता की जय च्या घोषणा देत सीमेवर 24 तास खडा पहारा देणा-या भारतीय लष्कराच्या सदर्न कमांड मधील 300 हून अधिक अधिकारी व जवानांनी दगडूशेठ गणपतीची आरती केली.

Pune Ganeshotsav 2023

1/8
'भारत माता की जय'च्या घोषणा देत सीमेवर 24 तास खडा पहारा देणा-या भारतीय लष्कराच्या सदर्न कमांड मधील 300 हून अधिक अधिकारी आणि जवानांनी 'दगडूशेठ' गणपतीची आरती केली.
2/8
भारतीय लष्कराच्या प्रमुख केंद्रांपैकी एक असलेल्या सदर्न कमांड (दक्षिणी मुख्यालय) मधील 330 कमांडचे जवान 'दगडूशेठ' गणपती चरणी नतमस्तक झाले.
3/8
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षी गणेशोत्सवात जवानांचे स्वागत करण्यात आले.
4/8
यावेळी लेफ्टनंट जनरल ए.के.सिंग, मेजर जनरल, ब्रिगेडियर, कर्नल, मेजर, कॅप्टन, सुभेदार यांसह लष्करातील वरिष्ठ अधिका-यांच्या हस्ते आरती झाली.
5/8
ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष सुनील रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सरचिटणीस अमोल केदारी, राजाभाऊ पायमोडे, इंद्रजीत रायकर, माऊली रासने, राजू आखाडे, अमोल चव्हाण आदी उपस्थित होते.
6/8
पुण्यात असलेल्या 24 मराठा बटालियन, 15 जाट बटालियन आणि 1 महार बटालियनचे जवान आणि कुटुंबीय यावेळी सहभागी झाले होते.
7/8
गणपती बाप्पा मोरया... च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी सदर्न कमांड तर्फे ट्रस्टला सन्मानचिन्ह देखील देण्यात आले.
8/8
यावेळी प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं.
Sponsored Links by Taboola