Pune ganeshotsav 2023 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे दगडूशेठ गणपती चरणी लीन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 131 व्या वर्षी गणेशोत्सवात देवेंद्र फडणवीस यांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष सुनील रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सरचिटणीस अमोल केदारी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फडणवीस आणि बावनकुळे गुरुवारी पुणे दौऱ्यावर होते.
त्यांनी दगडूशेठ गणपती बरोबरच पुण्याच्या मानाच्या आणि महत्वाच्या गणपती मंडळांमध्ये हजेरी लावली.
यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
चंद्रशेखर बावनकुळे यांनीही दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 131 व्या वर्षी गणेशोत्सवात चंद्रशेखर बावनकुळे यांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.