Health Tips : शरीरातीच्या व्याधी दूर करण्यासाठी सुपारी ठरते गुणकारी; फायदे ऐकाल तर, अवाक् व्हाल!
सुपारीचा वापर पान किंवा गुटखा बनवण्याकरता केला जातो. तसेच घरात काही पूजापाठ असेल तरीही सुपारीचा वापर असतोच. मात्र आयुर्वेदात सुपारीचे मोठे महत्व आहे. ही सुपारी शरीराकरता मोठ्या प्रमाणात फायदेशीर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामध्ये अनेक प्रकारचे आरोग्यवर्धक गुणधर्म आढळतात. मुळाच सुपारी एक औषधी वनस्पती आहे. सुपारीचा उपयोग प्राचीन काळापासून अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी केला जातो. याच सुपारीच्या सेवनाने कोण कोणते आजार दूर होऊ शकतात ते जाणून घेऊयात.
सुपारीमध्ये फ्लेव्होनॉइड्स, अल्कलॉइड्स, ग्लुकोसाइड्स, आयसोप्रिनॉइड्स, अमिनो अॅसिड्स आणि युजेनॉल यासारखे घटक आढळतात. हे सर्व घटक शरीराकरता अँटीआॅक्सीडंट म्हणून काम करतात आणि यामुळे अनेक गंभीर आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो.
उलट्या : सुपारीचे सेवन उलट्या थांबवण्याकरता खूप प्रभावी आहे. वास्तविक, सुपारीमध्ये अनेक चांगले घटक असतात, ज्यामुळे मळमळण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला वारंवार उलट्या होत असतील किंवा मळमळत असेल तर तुमच्यासाठी सुपारी हा एक उत्तम पर्याय आहे.
दातदुखी : सुपारीचे सेवन केल्याने तुमची दातदुखी कमी होण्यास मदत होते. कारण यात असणारे अनेक घटक वेदनाशामक म्हणून काम करतात. अशा परिस्थितीत ज्यांना दातदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुपारीचा वापर फायदेशीर ठरू शकतो.
पोट : बाहेरचे अन्न खाल्ले तर अनेक वेळा पोटाचा त्रास व्हायला सुरूवात होते. अशा वेळी सुपारी हा एक साधा, सोपा उपाय आहे. जुलाब सारख्या समस्या देखील सुपारीच्या सेवनाने दूर होतात.
मूळव्याध : मूळव्याध मध्ये सुपारीचे पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते. सोबतच यामुळे पचन देखील चांगले होते. मूळव्याध असणाऱ्या लोकांनी दिवसातून दोनॉ वेळा सुपारीचे पाणी पिणे तुम्हाला आवश्यक आहे.
तोंड येणे : तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल तर आणि त्यामुळे सतत तोंड येत असेल तर सुपारीचे सेवन करा. तोंड आलेले असल्यास तोंडात सुपारी ठेवल्याने वेदना कमी होण्यास मदत होते.
खाज सुटणे : घामामुळे अनेकदा शरीरावरील बऱ्याच भागांवर खाज सुटायला लागते. अशा परिस्थितीत लगेच आराम मिळावा म्हणून सुपारी चोळावी. तसेच तीळाच्या तेलात बुडवून सुपारी चोळून लावल्याने खाज कमी होऊ शकते.
वेदना पासून आराम - जर तुम्हाला कंबरदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी इत्यादी त्रास होत असतील तर ते टाळण्यासाठी सुपारीचे सेवन करावे. सुपारीमध्ये असलेले औषधी गुणधर्म तुम्हाला स्नायूंच्या दुखण्यापासून आराम देतात.