Health Tips : सतत व्यायाम करता? तुमची ही सवय हृदयाकरता घातक ठरू शकते, वेळीच सावध व्हा!
व्यायामामुळे शरीर निरोगी राहते. अनेकदा आजारातून सावरण्यासाठी किंवा आजारांपासून बचाव करण्यासाठी व्यायाम अत्यंत फायदेशीर ठरतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appव्यायाम हा तुमच्या दिनचर्येचा भाग असेल तर तो तुम्हाला तंदुरुस्त ठेवतो आणि अनेक आजारांपासूनही दूर राहतो.
पण सतत व्यायाम करणं किंवा अति व्यायाम करणं तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरतं.
तज्ज्ञांच्या मते, जास्त व्यायाम करणे हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं.
जास्त व्यायामामुळे ओव्हरस्ट्रेनिंग सिंड्रोम होऊ शकतो आणि हृदयाचे ठोके वाढू शकतात.
यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जे लोक मॅरेथॉन शर्यती किंवा हार्ड एक्झरसाईज करतात त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो.
अशा वेळी जीवनसत्त्वे, खनिजे आणि हर्बल उत्पादने हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
व्यायाम करताना शरीरावर जास्त ताण देणे टाळा.
तसेच व्यायाम आणि आहाराबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्या.