Kids Health : 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवल्यास हिवाळ्यात मुलं आजारी पडणार नाहीत; 'अशी' घ्या काळजी
हिवाळ्यात मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने ते लवकरच विषाणू आणि संक्रमणास बळी पडतात. यामुळेच हिवाळ्यात मुलांना खोकला, सर्दी किंवा ताप सहज येतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळा टाळण्यासाठी, शरीर उबदार ठेवावे. यासाठी मुलांना अनेक थरांमध्ये कपडे घालावेत. उबदार कपडे मुलांचे थंड वाऱ्यापासून संरक्षण करतात.
मुलांना फक्त थर्मल आणि स्वेटर घालण्याचा प्रयत्न करा. खूप जास्त आणि जाड स्वेटर घालणे टाळा. त्यामुळे मुलांना अतिउष्णतेची किंवा अस्वस्थतेची समस्या उद्भवू शकते.
अनेक महिला आपल्या मुलांना थेट स्वेटर घालायला लावतात, जे चुकीचे आहे. स्वेटर कितीही मऊ असला तरी त्यामुळे मुलांच्या अंगावर पुरळ किंवा खाज येऊ शकते. स्वेटर थेट घातल्याने मुलांमध्ये चिडचिड होऊ शकते, त्यामुळे मुलांनी कॉटनचा टी-शर्ट घातल्यानंतरच स्वेटर घालावेत.
थंड वारा आणि हिवाळ्यात मुलांचे कान, तोंड आणि पाय झाकून ठेवावेत. कारण कानात हवा गेल्याने घसा दुखू शकतो आणि सर्दी आतून बसू शकते. त्यामुळे बाहेर जाण्यापूर्वी मुलांना टोपी, स्कार्फ किंवा स्वेटर घालायला लावा. कारमधून प्रवास करताना तुमच्या मुलाला मास्क लावायला विसरू नका. तसेच, पायांत आणि हातांत मोजे वापरा.
हिवाळ्यात सुका मेवा खावा. ड्रायफ्रूट्स उष्ण असल्याने ते शरीर उबदार ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे मुलांना बदाम, अक्रोड, अंजीर, बेदाणे, खजूर असे ड्रायफ्रूट्स द्यावे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यांच्यासाठी सुक्या मेव्याचे लाडूही बनवू शकता.
थंड वातावरणात मुलांना संध्याकाळनंतर घराबाहेर पडू देऊ नका. मुलाला सकाळी आणि दुपारी खेळायला पाठवा. कारण त्यांच्या आरोग्यासाठी मैदानी खेळ फार महत्त्वाचे आहेत.