Health Tips : हदय आणि पोटासंबंधित विकार दूर ठेवायचेत? मग हिवाळ्यात कांद्याच्या पातीचं सेवन फायदेशीर
Green Onions Health Benefits : हिवाळ्यात कांद्याची पात खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिरवा कांदा अनेक आजारांना दूर ठेवण्यास मदत करतो. (PC:istock)

Green Onions Health Benefits
1/11
कांद्याच्या पातीमध्ये अनेक गुणधर्म आणि पोषक तत्वे आढळतात जे विशेषतः हिवाळ्यात फायदेशीर मानली जातात. (PC:istock)
2/11
कांद्याच्या पातीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि अनेक खनिज मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होऊन सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्या टाळता येतात.(PC:istock)
3/11
कांद्याची पाती रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. हिरव्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-6, फोलेट, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते.(PC:istock)
4/11
कांद्याच्या पातीमध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात, जे हिवाळ्यात हाडे आणि सांधेदुखीपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात.(PC:istock)
5/11
कांद्याची पाती खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहते, हिरव्या कांद्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी आणि फायबर असते, जे पचनासाठी खूप फायदेशीर असते.(PC:istock)
6/11
कांद्याच्या पातीमध्ये व्हिटॅमिन के (Vitamin K) चे प्रमाण जास्त असते, हे हाडांच्या मजबूतीसाठी आणि वाढीसाठी आवश्यक असते. (PC:istock)
7/11
व्हिटॅमिन K ची कमतरता असणाऱ्यांना ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता असते. अशावेळी कांद्याच्या पातीचे सेवन करावं. हिरव्या कांद्याच्या एक देठामध्ये 16-22 टक्के व्हिटॅमिन के आढळते.(PC:istock)
8/11
कांद्याच्या पातीचे सेवन हृदयासाठी फायदेशीर आहे. हिरव्या कांद्यामध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात.(PC:istock)
9/11
अँटिऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स नष्ट करतात, ज्यामुळे हदय रोगासारखे अनेक आजार होतात. (PC:istock)
10/11
कांद्याच्या पा फोटोकेमिकल देखील भरपूर असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करू शकतात. (PC:istock)
11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (PC:istock)
Published at : 10 Dec 2023 12:12 PM (IST)