IRTCTC चे काश्मीर टूर पॅकेज, जाणून घ्या कशी असेल ही कश्मीरची सफर...
IRCTC आपल्या प्रवाशांना काश्मीरच्या सफरसाठी घेऊन जात आहे. ज्या काश्मीरला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हटले जाते. ते काश्मीर पाहण्याची ही संधी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयआरसीटीसीचा हा प्रवास विमानातून केला जाईल, जो 6 मे पासून सुरू होईल. हे विमान इंदूरमधून उड्डाण करेल आणि काश्मारमध्ये पोहचेल.
ही टूर सहा दिवस आणि पाच रात्रींसाठी असेल. इंदूरपासून सुरु होईल आणि काश्मीरमधील श्रीनगर, गुलमर्ग,पहलगाम आणि सोनमर्ग या स्थळांची सफर पर्यटकांना करुन देईल. त्यानंतर पुन्हा इंदूरला येईल.
या पॅकेजमध्ये पाच दिवसांचा नाश्ता आणि जेवणाची सुविधा आहे.
या पॅकेजमध्ये तुम्ही श्रीनगरच्या हाऊस बोटमध्ये देखील एक रात्र घालवणार आहात. सोबतच चार दिवस तुम्हांला हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा असणार आहे.
हे पॅकेज तुमच्यासाठी 44,000 रुपयांचे असणार आहे. जे वाजवी दरात उपलब्ध आहे.
त्यामुळे तुम्हांलाही काश्मीरच्या खोऱ्याचा सुखद अनुभव घ्यायाचा असेल तर या टूरचा नक्कीच विचार करा