Met Gala: मेट गालामध्ये आलियाचा डेब्यू, व्हाइट गाउनमधील अदांनी वेधलं लक्ष
Alia Bhatt In Met Gala 2023: फॅशनचा सर्वात मोठा नाईट आऊट मेट गाला 1 मे रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळची थीम प्रसिद्ध फॅशन डिझायनर कार्ल लेगरफेल्ड यांना समर्पित करण्यात आली आहे. यंदा मेट गालामध्ये आलिया भट्टनं डेब्यू केलं असून आपल्या लूकनं तिनं साऱ्यांचंच लक्ष वेधलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआलिया भट्टनं मेट 2023 या गालामधून पदार्पण केलं आहे. पांढऱ्या रंगाचा गाऊन आलियानं परिधान केला आहे.
आलिया भट्टनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून मेट गालाचे फोटो शेअर केले आहेत.
आलियाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
मेट गालामधील आलियाचा अपीयरन्स 'हार्ट ऑफ स्टोन' या तिच्या हॉलीवूड पदार्पणापूर्वीच आला आहे.
आलिया भट्टचा ड्रेस नेपाळी-अमेरिकन डिझायनर प्रबल गुरुंगनं डिझाइन केला होता. दीपिका पदुकोणही या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
आई झाल्यानंतर आलिया भट्ट पहिल्यांदाच एका मोठ्या कार्यक्रमात दिसली.
यावेळचा तिचा लूक आणि फिटनेस सर्वांनाच चकित करत होता.
मेट गाला 2023 इव्हेंट न्यूयॉर्क सिटीमध्ये आयोजित करण्यात आला. यामध्ये आलिया भट्टनं हॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकलं.
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानंही मेट गाला 2023 मध्ये पती निक जोनाससह हजेरी लावली.