Priyanka Chopra : बाबो... 'Met Gala 2023'मधील प्रियांकाच्या लूकची चर्चा; हिऱ्याच्या नेकलेसची किंमत 204 कोटी!
'मेट गाला इव्हेंट 2023'मध्ये प्रियांका चोप्राने आपल्या लक्षवेधी लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'मेट गाला इव्हेंट 2023'मध्ये प्रियांकाचा किलर अंदाज पाहायला मिळाला.
बॉलिवूड ते हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांवर भूरळ पाडणाऱ्या प्रियांकाने 'मेट गाला इव्हेंट'साठी खास लूक केला होता.
'मेट गाला इव्हेंट'च्या रेड कार्पेटवर अभिनेत्रीने हाय स्लिट ऑफ शोल्डर आउटफिट घातला होता.
प्रियांकाने आपला लूक पूर्ण करण्यासाठी खास हिऱ्यांचा हार घातला होता.
'मेट गाला इव्हेंट 2023'मध्ये प्रियांकाने 11.6 कॅरेटचा हिऱ्यांचा हार घातला होता.
प्रियांकाने घातलेल्या हाराची किंमत 204 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.
प्रियांकाची 'सिटाडेल' ही सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
प्रियांकाचे 'मेट गाला इव्हेंट'मधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
देसी गर्लचा किलर अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.