नांदगावमधील योग शिक्षक बाळू मोकळ यांच्याकडून कडुलिंबाच्या झाडावर योगासने, 51 योगासनांसह 11 वेळा सूर्य नमस्कार
आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योग शिक्षक बाळू मोकळ यांनी झाडावर योगासने केली आहेत.
नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील जगधने वाडा येथे सूर्य नमस्कारासह तब्बल अर्धातास 51 योगासने प्रात्यक्षिके कडुनिंबाच्या झाडावर केली आहे.
यंदाची ' वसुधैव कुटुंबकम ' ही थीम योग दिनाच्या पार्श्वभूमीवर साजरी केली
पद्मासन, बंध पद्मासन, सर्वांगासन, हालासन, वक्रासन, अर्ध मतसेंद्रासन, भूनमणासान, त्रिकोनासन, विरासन, वृक्षासन, ताडासान, पवनमुक्त आसन, चक्रासन आदी 51 योगासने केली.
बाळू मोकळ असे योग शिक्षकाचे नाव आहे
तसेच 11 वेळा सूर्य नमस्कारही त्यांनी कडुनिंबाच्या झाडावर केले.
योग शिक्षक मोकळ यांनी दुचाकीवर यापूर्वी 51 योगासने केली होती.
या योगासनांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील नोंद करण्यात आली आहे.
मागील 18 वर्षांपासून ते योग शिक्षण देण्याचे काम करत असून वेगवेगळ्या शाळा, कॉलेज, संस्था आदी ठिकाणी जाऊन 150 हून अधिक योग कार्यशाळा त्यांनी घेतल्या आहेत
देशभरात विविध ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असून ते संयुक्त राष्ट्रांमध्ये योग दिन साजरा करणार आहेत.