Independence Day 2024 : यंदा 77 वा की 78 वा स्वातंत्र्यदिन? गोंधळून जाऊ नका! स्वातंत्र्यदिना विषयी अचूक माहिती जाणून घ्या..
अवघा भारत देश ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतो, तो राष्ट्रीय सण म्हणजेच स्वातंत्र्यदिन आला आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतावर अनेक दशके ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश सरकारचे राज्य होते. भारतीय आपल्याच देशात गुलामाचे जीवन जगत होते. मात्र, भारतीयांनी गुलामगिरीच्या साखळ्या तोडून क्रांती आणि चळवळी केल्या, त्यामुळे इंग्रजांना पराभव स्वीकारून देश सोडावा लागला.
15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. लाल किल्ल्यावर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकावून प्रथम स्वातंत्र्यदिन साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.
या वर्षी भारतात कितवा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे? 2024 च्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय आहे?
भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांचा आणि नेत्यांचा संघर्ष फळाला आला आणि 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला. मागील काही वर्षांपूर्वी भारताने स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा केला होता.
मात्र यंदा लोक संभ्रमात आहेत की, भारत 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार की 78 वा. जर तुम्ही स्वातंत्र्याच्या तारखेपासून म्हणजे 15 ऑगस्ट 1947 मोजले तर देश स्वतंत्र होऊन 77 वर्षे पूर्ण झाली आहेत. यासह, भारत 2024 मध्ये 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.
2024 च्या स्वातंत्र्य दिनाची थीम - या वर्षी स्वातंत्र्य दिन 2024 ची अधिकृत थीम 'विकसित भारत' आहे. ही थीम 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्रात बदलण्याच्या सरकारच्या संकल्पनेचे प्रतीक आहे.
ही थीम भारतातील पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, शिक्षण आणि आरोग्य सेवा यासारख्या प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते.