WTC 2023-25 मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप-5 फलंदाज; भारताचा खेळाडू आघाडीवर, इंग्लंडच्या तब्बल 3 खेळाडूंचा यादीत समावेश
WTC 2023-25: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ची सुरुवात गेल्या वर्षी ॲशेस मालिकेने झाली. या स्पर्धेत आतापर्यंत 33 सामने खेळले गेले आहेत.

WTC 2023-25
1/6
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ची सुरुवात गेल्या वर्षी ॲशेस मालिकेने झाली. या स्पर्धेत आतापर्यंत 33 सामने खेळले गेले आहेत. इंग्लंडने सर्वाधिक 13 सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियानेही 12 सामने खेळले आहेत. कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी आणखी 37 सामने खेळवले जाणार आहेत. सध्या दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात मालिका सुरू आहे. दरम्यान, आम्ही तुम्हाला या चॅम्पियनशिप सायकलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 फलंदाजांबद्दल जाणून घ्या...
2/6
यशस्वी जैस्वाल- 1028 धावा- आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत भारताचा यशस्वी जैस्वालचे नाव अग्रस्थानी आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. यशस्वीने कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 9 सामन्यांच्या 16 डावात 1028 धावा केल्या आहेत.
3/6
जो रूट- 1023 धावा- इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट दुसऱ्या क्रमांकावर आहे. यशस्वी आणि रूट यांच्यात केवळ 5 धावांचा फरक आहे. रूटने आणखी 7 डावात फलंदाजी केली असली तरी या चॅम्पियनशिप सायकलमध्ये सर्वाधिक 8 वेळा 50+ धावांचा डाव खेळण्याचा विक्रम रूटच्या नावावर आहे.
4/6
जॅक क्रॉली- 984 धावा- इंग्लंडने सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत, त्यामुळे त्यांचे फलंदाज धावा करण्यात आघाडीवर असल्याचे दिसते. संघाचा सलामीवीर जॅक क्रोली त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. 13 कसोटी सामन्यांच्या 23 डावांमध्ये त्याने 43 च्या सरासरीने आणि 79 च्या स्ट्राईक रेटने आपल्या बॅटने 984 धावा केल्या.
5/6
उस्मान ख्वाजा- 943 धावा- ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा यानेही या कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अप्रतिम फलंदाजी केली आहे. आतापर्यंत डावखुऱ्या फलंदाजाने 12 कसोटी सामन्यांच्या 24 डावात 943 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 41 आहे आणि त्याचा स्ट्राईक रेट फक्त 40.33 आहे.
6/6
बेन डकेट- 842 धावा- सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 फलंदाजांमध्ये फक्त चार सलामीवीर आहेत. इंग्लंडचा डॅन डकेट त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने 83 च्या स्ट्राईक रेटने 842 धावा केल्या आहेत. भारत दौऱ्यावर त्याने 153 धावांची इनिंग खेळली होती.
Published at : 13 Aug 2024 11:33 AM (IST)