Ignorance In Relationship : रिलेशनशिपमध्ये दुर्लक्ष केल्याचा दुष्परिणाम थेट शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर होतो, पाहा
दोन्ही बाजूंनी प्रेम आणि आदर असेल तेव्हाच कोणतेही नाते पुढे जाते. भांडण झाल्यानंतर काही दिवस एकमेकांशी न बोलणे सामान्य आहे, परंतु कधीकधी एक जोडीदार काही कठोर पावले उचलतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतो आपल्या जोडीदाराला न कळवता त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून काढून टाकतो. फोन नंबर ब्लाॅक करतो. कॉल आणि मेसेजला प्रतिसाद देणे थांबवतो. आपल्या जोडीदाराकडे दुर्लक्ष करण्याचा हा मार्ग पूर्णपणे चुकीचा आहे. त्याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्हीवर खोल परिणाम होतो.
जेव्हा एखाद्या नातेसंबंधात एखाद्या व्यक्तीकडे खूप दुर्लक्ष केले जाते, तेव्हा त्याचा मानसिकदृष्ट्या खोल परिणाम होतो. ती व्यक्ती अनेक भावनांशी स्वत: लढायला लागते. कधी तिला राग येतो, तर कधी ती दु:खी होते.
प्रत्येक वेळी दुर्लक्ष केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात त्रास व्हायला सुरूवात होते. त्याचे मन कशातच लागत नाही. जोपर्यंत त्यांचा जोडीदार त्यांच्याशी संपर्क साधत नाही, तोपर्यंत हे चालू राहते.
केवळ मानसिकच नाही तर अशा उदासीनतेचा शारीरिक आरोग्यावर देखील परिणाम होतो. जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता आणि अचानकच तुमच्याकडे दुर्लक्ष केले जाते, तेव्हा कोर्टिसोल हार्मोन्स तुमच्यामध्ये सक्रिय होतात. त्याचे शारीरिक दुष्परिणाम डोकेदुखीपासून हृदयविकारापर्यंत होतात. अशा स्थितीत नीट झोप येत नाही.
जेव्हा कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करते तेव्हा तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारू लागता. मी काय चुकीचे केले आहे? माझ्यात काही चूक आहे का? हे होऊ नये म्हणून मी काय करावे? यामुळे तुमचा स्वत:विषयीचा आत्मविश्वास देखील कमी व्हायला लागतो.
एखाद्या वेळी परिस्थिती किंवा आपला पार्टनर चुकीचा असतो. मात्र अनेकदा आपल्यालाच दोष दिला जातो. त्यामुळे नैराश्य आणि ताण येऊ लागतो.
जर जोडीदार काही दिवसांच्या विश्रांतीसाठी अशा पद्धतींचा अवलंब करत असेल तर ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. असे केल्याने नात्यात कायम फूट पडू शकते. त्याऐवजी तुम्ही या समस्येवर खुलेपणाने बोललात तर गोष्टी सहज सुटतील.
ज्या व्यक्तीवर तुम्ही खूप प्रेम केले ती व्यक्ती जेव्हा तुमच्याकडे दुर्लक्ष करते, तेव्हा ती व्यक्ती निराशेने भरून जाते. अशा व्यक्तीच्या मनात अनेक प्रश्न येतात की, तो माझ्याकडे दुर्लक्ष का करत आहे? मी पुढे काय करावे? सर्व काही ठीक करण्यासाठी मी काय करावे?
रिलेशनमध्ये कधी काही प्राॅब्लेम येत असेल तर दुर्लक्ष करू नकात. त्याऐवजी तुम्ही तुमच्या पार्टनरला विश्वासात घेऊन सगळे समजून सांगण्याचा प्रयत्न करा.