Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Post Pregnancy Self Care : आई झाल्यानंतर स्वतःची काळजी कशी घ्याल? 'या' 5 टिप्ससह मातृत्वाचा आनंद घ्या, तुम्ही नेहमी आनंदी राहाल
प्रसूतीनंतर, नवीन आईच्या आयुष्यात अनेक प्रकारची आव्हाने येतात. ज्यानंतर ती स्वतःची काळजी कशी घ्यावी हे विसरते. या टिप्सच्या मदतीने तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगरोदरपणाच्या कालावधीनंतर, आईला खूप आनंद होतो. ज्यानंतर मुलाला पाहून आई आपले सर्व त्रास विसरते. यानंतर आईचा सर्वात गोंधळात टाकणारा पिरियड सुरू होतो. ज्यामध्ये ती अनेक जबाबदाऱ्या घेते असते.
बाळाला दर अर्ध्या तासाने दूध पाजणे, त्याचे ओले कपडे बदलणे, स्वच्छ ठेवणे, बाळाला झोपायला घालणे, आंघोळ घालणे, अशा जबाबदाऱ्या अनेक मातांवर येऊन पडतात. त्या या सर्व जबाबदाऱ्यांत इतक्या अडकतात की, स्वतःसाठी वेळ काढू शकत नाहीत.
यामुळे त्यांना शारिरीक आणि मानसिक थकव्याला सामोरे जातात. अशा वेळी सोप्या काही टिप्स फाॅलो केल्या तर तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकाल आणि स्वतःसाठी वेळ देऊ शकाल.
बाळाच्या जन्मापूर्वी आणि नंतर आईच्या शरीरात अनेक बदल होतात. अशा परिस्थितीत, आपल्या मुलास पुरेसे दूध देण्यासाठी, आपण आपल्या आहारात प्रथिने आणि कॅल्शियम असलेल्या गोष्टींचा समावेश करावा. तसेच डॉक्टरांनी दिलेले औषधे वेळेवर घेत राहावे, अन्यथा तुमचे शरीर कमजोर होऊ शकते. तसेच दिवसभरात भरपूर पाणी प्या.
मुलाच्या जन्मानंतर, आईमध्ये अनेक हार्मोनल, शारीरिक आणि मानसिक बदल होतात. त्यामुळे नवीन आई स्वत: मानसिकदृष्ट्या कमकुवत आणि अधिक भावनिक बनते. यामुळेच त्यांची अधिक चिडचिड होते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी किंवा तुमच्या पतीशी बोलून तुमच्या भावना व्यक्त करा.
मुलाच्या जन्मानंतर, आईने तिचे शरीर लवकर बरे होण्यासाठी वेळेवर झोपणे महत्वाचे आहे. म्हणून, जेव्हा तुमचे मूल दिवसा झोपायला जाते, तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत थोडी विश्रांती देखील घ्यावी.
मुलाच्या जन्मानंतर काही दिवसांनी, तुम्ही वॉक करू शकता आणि काही हलके योगासने देखील करू शकता. त्यामुळे तुमच्या आत सकारात्मकता येईल.
जर तुमची नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल, तर आठवडाभरानंतर तुम्ही अनुभवी व्यक्तीकडून मसाज करून घेऊ शकता. दुसरीकडे, जर तुम्ही सी सेक्शनने मुलाला जन्म दिला असेल, तर तुम्ही 21 दिवसांनंतर मालिश करू शकता. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल.
तुमच्या काही कामात तुमच्या कुटुंबातील सदस्यांची मदत घ्या. यामुळे तुमचे मन आणि हृदय हलके राहील आणि तुम्हाला ताण येणार नाही.