Weight Gain Tips : खूप प्रयत्न करूनही वजन वाढत नाही, 'या' नैसर्गिक पद्धतींनी वाढवा वजन
अनेक लोक त्यांचे बारिक शरीर पाहून अस्वस्थ होतात आणि वजन वाढवण्याचा प्रयत्न करतात. बरेच लोक त्यांच्या प्रयत्नात यशस्वी होतात, तर काही लोक भरपूर खाऊन पिऊनही वजन वाढवण्यात अपयशी ठरतात. जास्त बारीक असणे आरोग्यासाठी चांगले नाही आणि यामुळे लोकांचे व्यक्तिमत्वही बिघडते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्यांचे वजन खूप कमी आहे ते कायम तणावात असतात. निरोगी आहार घेऊन आणि व्यायाम करूनही त्यांचे वजन वाढत नाही. आहारतज्ज्ञांनी दिलेल्या काही टिप्स अवश्य फॉलो करण्याचा प्रयत्न करा. याच्या मदतीने तुम्ही काही आठवड्यांत तुमचे वजन वाढवू शकता.
सामान्यतः लोक जास्त कॅलरीयुक्त पदार्थ खाऊन वजन वाढवण्याचा प्रयत्न करतात, हा एक चांगला मार्ग आहे. आहाराव्यतिरिक्त शारीरिक हालचाली आणि तुमची जीवनशैली यांचाही आरोग्यावर मोठा परिणाम होतो. जर तुमचे वजन वेगाने कमी होत असेल तर तुम्हाला डॉक्टरांशी संपर्क साधण्याची गरज आहे. एखाद्या आजारामुळे देखील होऊ शकते.
आहारतज्ञांच्या मते वजन वाढवण्यासाठी दिवसातून 5 ते 6 वेळा लहान जेवण घेणे सुरू करा. यासाठी तुम्हाला एक प्लॅन बनवावा लागेल आणि ठराविक वेळेत काहीतरी हेल्दी खावे लागेल. असे केल्याने तुमच्या शरीराला भरपूर कॅलरी आणि पोषक तत्वे मिळतील आणि काही आठवड्यांत तुमचे वजन वाढू लागेल.
वजन वाढवण्यासाठी तुम्हाला पोषक तत्वांनी युक्त आहार घ्यावा लागेल. तुमच्या आवडीच्या गोष्टी खा. भरपूर फळे आणि भाज्यांचे सेवन करा. यामुळे तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही आणि वजन वाढवणे सोपे होईल. पुरेशा प्रमाणात पाणी पिणे देखील खूप महत्वाचे आहे.
अधिक कॅलरीजसाठी तुम्ही तुमच्या आहारात चीज, बटर, दूध इत्यादी पदार्थांचा समावेश करू शकता. स्नॅक्समध्ये तुम्ही ड्राय फ्रूट्सचा समावेश करू शकता. यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे पोषण मिळेल आणि तुमच्या शरीराचे वजन झपाट्याने वाढू लागेल.
बरेच लोक वजन न वाढल्याने त्रासलेले असतात. वजन कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात. काही वेळा आरोग्याच्या समस्यांमुळे असे होऊ शकते, तर काही लोक योग्य आहार न घेतल्याने बारीक होतात.
शक्य तितक्या स्मूदी आणि शेकचे सेवन करा आणि कमी पोषक असलेली पेये टाळा. सोडा, कोल्ड्रिंक्स यांसारख्या गोष्टी टाळा. आपल्या आहारात या आरोग्यदायी पेयांचा समावेश करा.
भरपूर प्रमाणात अॅव्होकॅडो सेवन करणे शरीरातील चरबी वाढवण्याचा एक चांगला मार्ग आहे. अॅव्होकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते, जे वजन वाढवण्यास मदत करते.
वजन लवकर वाढवण्यासाठी तुम्ही बटाट्याचे सेवन सुरू करू शकता. हे तुमच्या शरीराला अतिरिक्त कॅलरीज पुरवते. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.