Food Poisoning : पावसाळ्यात फूड पॉयझनिंग टाळण्यासाठी 'या' गोष्टी कायम लक्षात ठेवा!
पावसाळ्यात फूड पॉयझनिंगची (Food Poisoning) समस्या खूप सामान्य आहे. अनेकदा लोकांना पोटदुखी (Stomachache), उलट्या (Vomiting), डायरिया अशा समस्यांना सामोरे जावे लागते. फूड पॉयझनिंगची समस्या दूषित अन्न खाल्ल्याने होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावसाळ्यात शिळे अन्न कधीही खाऊ नये. कारण शिळ्या अन्नात जिवाणू (Bacteria) झपाट्याने वाढतात. विशेषतः पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे बॅक्टेरिया अन्नाला चिकटून राहू शकतात. ज्यामुळे तुम्हाला अन्नातून विषबाधा होऊ शकते. त्यामुळे या ऋतूत शिळे अन्न खाणे टाळावे.
अर्धवट शिजवलेले अन्न (Food) कधीही खाऊ नका. कारण बाहेरुन आणलेल्या भाज्या किंवा मांसाहारी वस्तूंवर बॅक्टेरिया आधीच असतात. जेव्हा तुम्ही ते योग्य प्रकारे शिजवत नाही, तेव्हा हे जंतू मरत नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला विषबाधा होऊ शकते.
गरमागरम अन्न शिजवणे आणि ते खाणे केव्हाही चांगले
जर तुम्ही फळे किंवा भाज्या खात असाल तर आधी ते पूर्णपणे स्वच्छ करा. कारण पावसात विषाणू आणि बॅक्टेरिया सहजपणे त्यावर बसतात. जर तुम्ही फळे किंवा भाज्या न धुता खाल्ले तर ते बॅक्टेरिया तुमच्या शरीरात जाऊ शकतात.
तुम्हाला हवे असल्यास बाजारात भाज्या आणि फळे धुण्याचे औषध उपलब्ध आहेत, त्याचा वापर तुम्ही करु शकता
पावसाळ्यात स्वयंपाकघरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. कटिंग बोर्ड, चाकू आणि भांडी धूत राहा. यामुळे तुमचे स्वयंपाकघर बॅक्टेरिया आणि विषाणूंपासून मुक्त राहिल आणि तुम्ही फूड पॉयझनिंग टाळू शकता.
रस्त्यावर मिळणारे स्ट्रीट फूड खाणे पूर्णपणे टाळा. हे पदार्थही उघडे असल्याने त्यावर बॅक्टेरिया होण्याची शक्यता जास्त असते, जर तुम्ही हे अन्न खाल्ले तर तुम्हाला फूड पॉयझनिंग देखील होऊ शकते. कॉलराचा धोका देखील असू शकतो.