Eid-ul-Adha : सोलापुरात ईदच्या निमित्ताने सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम पार

राज्यभर आज सर्वत्र मुस्लिम बांधवाची बकरी ईद म्हणजेच ईद-उल-अधा (Eid al-Adha 2023) साजरी करण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विविध ठिकाणी मुस्लिम समूदायाने सामूहिक नमाज पठण केलं. आज ईद सोबतच आषाढी एकादशी आल्याने अनेक ठिकाणी कुर्बानी न देण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला होता.

सोलापुरात बकरी ईद निमित्त हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन ईदगाह मैदानावर नमाज पठण केलं.
सोलापूर शहर काजी मुफ्ती अमजद अली यांनी या ठिकाणी नमाज पठण आणि मार्गदर्शन केले.
सोलापुरातल्या होटगी रोडवरील आलमगीर ईदगाह समोर सकाळी नऊ वाजताच्या सुमारास हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलं.
लोकांनी नमाज अदा करून देशात सुख-समृद्धीसोबतच शांतता आणि शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली.
इस्लामिक कालगणनेतील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी करण्यात येते.