Old Songs: बॉलीवूडच्या 'या' 8 रिमिक्स गाण्यांनी ओरिजिनल गाण्यांची लावली वाट! पसुरी ते हम्मा हम्मापर्यंत सर्व गाणी जबरदस्त ट्रोल; पाहा...
बॉलीवूडमध्ये मागील काही काळापासून जुन्या गाण्यांचे रिमिक्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. फार कमी जुन्या गाण्यांचे रिमेक हे मूळ गाण्यांपेक्षा चांगले असतात. बऱ्याचदा रिमिक्स गाण्यांमुळे मूळ गाणी खराब झाली आहेत, त्यामुळे या रिमेक गाण्यांना प्रेक्षकांनी नाकारलं आहे. पाहूया अशीच काही रिमेक गाणी...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपसुरी - 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटातील 'पसुरी' या गाण्याचा रिमेक नुकताच प्रदर्शित झाला आहे. मूळ पसुरी पाकिस्तानी गायक अली सेठी आणि शे गिल यांनी गायले होते. कार्तिक आर्यन-कियारा अडवाणीचा हा रिमेक सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
तू चीज बडी है मस्त मस्त - अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्या 'मोहरा' चित्रपटातील 'तू चीज बडी है मस्त मस्त' हे गाणं एव्हरग्रीन हिटच्या यादीत येतं. पण, कियारा आणि मुस्तफाचे रिमेक व्हर्जन यात काही वेगळं आणि अफलातून घेऊन आलं नाही.
एक दो तीन - 'तेजाब' चित्रपटातील माधुरी दीक्षितचं 'एक दो तीन हे' गाणं आजही लोकांच्या ओठावर आहे, मात्र या गाण्याच्या रिमेकमध्ये माधुरीची जागा जॅकलीन फर्नांडिसने घेतली तेव्हा प्रेक्षकांना ते आवडलं नाही.
हम्मा हम्मा - एआर रहमानचे 'हम्मा हम्मा' हे गाणं बादशाह आणि तनिष्क बागची यांनी 'ओके जानू' चित्रपटात पुन्हा तयार केलं होतं. एआर रहमानलाही हे रिमिक्स आवडलं नाही.
मस्साकली - एआर रहमानने 'मरजावान' चित्रपटात दिल्ली-6 चं 'मस्साकली' गाणं पुन्हा रिमिक्स केलं, परंतु पूर्वीचं गाणं हेच जबरदस्त ठरलं आहे.
छम्मा छम्मा - उर्मिला मातोंडकरचं 'चायना गेट' चित्रपटातील आयटम साँग 'छम्मा छम्मा' हे त्या काळातील सुपरहिट गाण्यांपैकी एक होतं. पण जेव्हा या गाण्यात उर्मिलाची जागा एली अवरामने घेतली तेव्हा ते कोणालाच आवडले नाही.
मैने पायल है छनकाई - फाल्गुनी पाठकचं 'मैने पायल है छनकाई' हे गाणं आजही 90 च्या दशकातील मुलांच्या ओठावर आहे, पण जेव्हा नेहा कक्करने या गाण्याचं रिमिक्स केलं तेव्हा तिला चांगलंच ट्रोल करण्यात आलं.
टिप टिप बरसा पाणी - अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्या 'मोहरा' चित्रपटातील 'टिप टिप बरसा पाणी' या गाण्याचं कॅटरिना कैफने रिमेक बनवलं, त्याला देखील प्रेक्षकांनी नापसंती दर्शवली.