Cleaning Hacks : घरातील पडदे घाण झाले आहेत? करा 'हे' सोपे उपाय
घराची साफसफाई करताना अनेकदा लोक पडद्याच्या घाणीकडे दुर्लक्ष करतात. त्याच वेळी, दररोजच्या धुळीमुळे पडदे काळे आणि घाण दिसू लागतात. पडदे साफ करताना कित्येकदा त्यावरचे डाग लवकर निघत नाहीत. अशा परिस्थितीत, काही सोपे उपाय तुम्ही केले तर पडदे नव्यासारखे दिसू लागतील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघराचे दरवाजे, खिडक्यांना लावलेले पडदे काढणे, ते धुणे आणि नंतर ते कोरडे करणे आणि परत ठेवणे हे खूप कठीण काम आहे. अशा परिस्थितीत व्यस्त रूटिनमुळे लोकांना इच्छा असूनही पडदे धुता येत नाहीत. पडदे साफ करण्याच्या काही टिप्स जाणून घ्या. त्याच्या मदतीने तुम्ही फार कमी वेळात पडदे साफ करू शकाल.
अनेकदा वॉशिंग मशिनमध्ये धुतल्यानंतरही पडद्यावरील डाग सहजासहजी दूर होत नाहीत. अशा परिस्थितीत व्हाईट व्हिनेगर वापरणे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. यासाठी वॉशिंग मशिनमध्ये नियमित डिटर्जंट पाण्यात मिसळा. तुम्ही डिटर्जंटऐवजी हँडवॉश देखील वापरू शकता. नंतर त्यात 1 कप व्हाईट व्हिनेगर घाला. यामध्ये धुतल्याने पडद्यावरील डाग सहज दूर होतील.
अनेक वेळा घाईघाईत लोक पडद्यासोबत इतर कपडे देखील वॉशिंग मशीनमध्ये टाकतात. यामुळे ते कपडे देखील घाण होऊ शकतात. वॉशिंग मशीनमध्ये एकाच वेळी एवढे कपडे टाकल्याने नुकसान होऊ शकते. म्हणून, पडदे आणि इतर कपडे स्वतंत्रपणे धुणे चांगले.
सिल्कचे पडदे वॉशिंग मशिनमध्ये धुतल्याने खराब होतात, अशा परिस्थितीत ते हाताने धुणे चांगले. पडदा धुण्यापूर्वी व्हिनेगरच्या पाण्यात भिजवा. यानंतर, पडदा सौम्य डिटर्जंट किंवा हँडवॉशने स्वच्छ करा. पडदे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही शॅम्पू देखील वापरू शकता.
काही वेळेस पडदे घरी धुऊन खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांना ड्राय क्लिनींगसाठी पाठवणे चांगले आहे. हार्ड डिटर्जंट वापरू नका. पडदे धुतल्यानंतर त्यांना जास्त वेळ उन्हात ठेवू नका. यामुळे पडद्यांची चमक कमी होऊ शकते.
जर पडदे फक्त धुळीने घाणेरडे दिसत असतील तर त्यांना स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ब्रश वापरू शकता. ब्रशला वरपासून खालपर्यंत नीट हलवून पडद्याच्या कोपऱ्यातून धूळ झटकून टाका.
हाताने साफ करण्यापेक्षा व्हॅक्यूम क्लिनरने पडदे अधिक स्वच्छ दिसतात. त्यामुळे पडदे खूप घाण झालेले नसतील आणि तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर व्हॅक्यूम क्लिनर हा पर्याय तुमच्यातकरता चांगला आहे.
तर सोपा उपाय म्हणजे तुम्ही पडद्यांना जोर-जोरात झटका याने धूळ निघून जाईल. यासोबतच काही वेळ उन्हातही ठेवू शकता. असे केल्याने, पडद्यांचा वास दूर करणे तुम्हाला सोपे जाऊ शकते.
नियमीतपणे घरातील पडदे स्वच्छ करणे फार गरजेचे आहे.