Gautami Patil : गौतमी पाटीलचा 'घुंगरू' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज!
सबसे कातील गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेड लावलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगौतमी पाटील आता रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे.
'घुंगरू' या सिनेमाच्या माध्यमातून गौतमी पाटील रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे.
गौतमीचा 'घुंगरू' हा सिनेमा या ऑक्टोबर महिन्यातच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नृत्याचा मंच गाजवणाऱ्या गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
गौतमीचा 'घुंगरू' हा सिनेमा लोककलावंतांच्या आयुष्यावर आधारित आहे.
'घुंगरू' या सिनेमात सिनेप्रेक्षकांना प्रेमकथा, लोककलावंतांचं आयुष्य त्यांचा संघर्ष आणि रहस्यमय गोष्टी पाहायला मिळणार आहेत.
लोक कलावंतांचं आयुष्य उलगडणारा गौतमीचा 'घुंगरू' हा सिनेमा आहे.
गौतमी पाटीलचा हा पहिलाच सिनेमा असून महाराष्ट्रात सध्या या सिनेमाची चर्चा आहे.
गौतमीच्या 'घुंगरू' या सिनेमाचं शूटिंग सोलापूर, माढा, हंपीसह परदेशात झालं आहे.