अकोल्यात करटूल्याच्या भाजीचा प्रयोग, कमी खर्चात चांगल उत्पन्न
रानमेवा म्हणून ओळखली जाणाऱ्या करटूल्याच्या भाजी लागवडीचा प्रयोग अकोला जिल्ह्यातील एका शेतकरी दाम्पत्यानं केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदहा गुंठ्यात या शेतकऱ्याला चांगल उत्पन्न देखील मिळालं आहे. पाहुयात त्यांची यशोगाथा.
अकोला शहरापासून पंचवीस किमी अंतरावर असलेलं पारस गावातील शेतकरी श्रीकृष्ण पांडुरंग लांडे आणि संगिता लांडे यांनी करटुल्याच्या भाजीचा प्रयोग केला आहे.
दोन महिन्यात तब्बल 250 क्विंटलहून अधिक शेतमालाल निघला असून त्यातून चाळीस ते पन्नास हजार रुपयांचे उत्पन्न मिळालं आहे. करटुल्याची भाजीचा धाडसी प्रयोग करणारे हे पहिलेच शेतकरी ठरले आहेत.
श्रीकृष्ण लांडे यांच्याकडं पाच एकर शेती आहे. लांडे पारंपरिक पिके घेतात, मात्र त्यातून हवे तसे उत्पन्न त्यांना लाभत नाही. आता पारंपरिक शेतीसह काहीतरी नवीन धाडस करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आणि तो यशस्वी झाला.
युट्युबवरुन आणि कृषी विभागाच्या आत्म्यानं केलेल्या मार्गदर्शनानुसार त्यांनी गेल्या वर्षी आपल्या शेतात पाच गुंठ्यात रानातील मेवा म्हणून ओळखलं जाणारं करटूल्याची भाजीची लागवड केली.
या वर्षी देखील त्यांनी करटूल्यांचे लागवड क्षेत्र वाढवलं असून ते दहा गुंठ्यांपर्यंत पोहोचवलं आहे.
कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार लांडे यांनी शेतात करटूल्याची लागवड करण्यासाठी वेलीचा संगोपन म्हणजेच वाढ कशी करता येईल याची काळजी घेतली.
लांडे यांनी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर केला नाही. सुरुवातीला फक्त शेणखताचा वापर केला. त्यानंतर कुठल्याच खताचा वापर केला नाही. दरम्यान, करटुल्याची लागवड केल्यानंतर त्याला जमीनीत कंद तयार होतात.