Vastu Tips : बाथरूममध्ये ठेवलेल्या 'या' गोष्टी घरात आणतात दारिद्र्य, कोणत्या आहेत त्या गोष्टी पाहा
वास्तुशास्त्रात सकारात्मक ऊर्जेला विशेष महत्त्व आहे. यानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये एक विशेष ऊर्जा असते जी व्यक्तीच्या जीवनावर नक्कीच प्रभाव पाडते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवास्तूमध्ये घराच्या बाथरूमसाठी काही खास नियमही सांगण्यात आले आहेत. वास्तूनुसार बाथरूममध्ये ठेवलेल्या काही वस्तू घरात गरिबी आणतात. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रानुसार, कोणीही आपल्या बाथरूममध्ये चुकूनही तुटलेला आरसा लावू नये. घरामध्ये तुटलेला आरसा ठेवल्याने वास्तू दोष निर्माण होतात. त्यामुळे घरात गरिबी येते आणि आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते.
बाथरूममध्ये तुटलेली चप्पल कधीच ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार, तुटलेली चप्पलीमुळे घरात नकारात्मक ऊर्जा ऊर्जा आणते. तुमची चप्पल तुटली असेल तर लगेच घराबाहेर फेकून द्या.
तर बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवणे अशुभ मानले जाते. . घरात ठेवलेली रिकामी बादली अशुभ घडवते. त्यामुळे बाथरूममध्ये बादली नेहमी भरलेली ठेवावी.
बाथरूममधील नळ जर खराब झाला असेल तर तो लवकरात लवकर दुरूस्त करून घेणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्रानुसार,नळातून जर सतत पाणी गळत असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा येते. याकारणाने घरातील खर्च वाढायला लागतो.
बाथरूममध्ये कधीही ओले कपडे ठेवू नयेत. वास्तूनुसार, ओले कपडे असल्यास ते धुवा आणि लगेच घराबाहेर सुकविण्यासाठी ठेवा. बाथरूममध्ये ओले कपडे सोडल्याने सूर्यदोष होतो.
वास्तूनुसार बाथरूममध्ये झाडे कधीही ठेवू नयेत. असे मानले जाते की बाथरूममध्ये ठेवलेली झाडे लवकर खराब होतात आणि घरातील वास्तु दोष वाढवतात.
तर बाथरूममध्ये असणारा टब किंवा शाॅवर हा उत्तर दिशेला असणे जास्त गरजेचे आहे. टब किंवा शाॅवर जर दक्षिण दिशेला असेल तर घरात नुकसान व्हायला लागते.
सोबतच बाथरूममध्ये जर आरसा लावणार असाल तर तो दरवाजाच्या मागे लावणे गरजेचे आहे. तसेच घरातील पायऱ्यांच्या खाली बाथरूम किंवा टाॅयलेट बांधले जाणार नाही. याची काळजी घेणे गरजेचे आहे.