Healthy Diet Plan For Old People : म्हातारपणात कोणते पदार्थ खाणे शरीराकरता गरजेचे आहे, पाहा
जसे वय वाढत जाते तसे अनेक आजार मागे लागतात. डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि शुगर यासारखे बरेच आजार होतात. वाढते वय शरीराला कमकूवत बनवते. अशा वेळी वाढत्या वयाता चांगला आहार घेणे गरजेचे आहे. त्याकरता काय करावे पाहूयात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपन्नाशीत आल्यानंतर शक्यतो पौष्टिक आहार घेणे खूप गरजेचे आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने हिरव्या भाज्या , फळे, प्रोटीनयुक्त पदार्थ, डेरी प्रोडक्ट्स या समावेश असावा. या पदार्थांमुळे शरीराला मुबलक प्रमाणात ऊर्जा मिळेल आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
तर जास्त मीठ आणि साखर याचे सेवन मुळीच करू नये. जास्त प्रमाणात साखर खाल्ली तर मधूमेह होऊ शकतो. तर मीठामुळे अल्झायमर , फॅटी लिव्हर , हाय ब्लड प्रेशर , लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉल असे आजार होतात.
फळे, भाज्या आणि कडधान्य यांसारख्या फायबर युक्त अन्नपदार्थ खाल्ल्याने वृद्ध लोकांचे शरीर निरोगी होण्यास मदत होते आणि त्यांचे पोट देखील स्वच्छ राहते. याशिवाय, खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास देखील मदत करू शकते.
म्हातारपणात शरीरात पाण्याची कमतरता असेल तर खूप गंभीर परिणाम होऊ शकते. त्यामुळे स्वत:ला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. पुरेशा प्रमाणात पाणी प्या
तर म्हातारपणात अति खाणे टाळावे. नेहमी आपल्या इच्छेपेक्षा थोडे कमी खा. आपल्याला आवश्यक तेवढेच अन्न खा. जास्त अन्न खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचते.
जसे वय वाढत जाते तसे शरीरातील हाडे कमकूवत व्हायला लागतात.त्याकरता कॅल्शियमचे सेवन करणे मोठ्या प्रमाणात गरजेचे आहे. यासाठी दही खाणे गरजेचे आहे. दह्यात व्हिटामीन बी, प्रोबायोटिक्स आणि व्हिटामीन डी असते.
म्हातारपणात शरीराला प्रोटीनची मोठ्या प्रमाणात गरज असते. अशा वेळी तुम्ही नियमीत एक-दोन अंड्याचे सेवन करू शकता
कर्करोग, मधुमेह आणि लठ्ठपणा यासारख्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम सेवन करावे. रोज बदाम खाल्ल्याने टाईप 2 मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते, असे अनेक संशोधनातून समोर आले आहे. रिबोफ्लेविन, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई, प्रथिने यांसारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक बदामामध्ये आढळतात, जे 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहेत.
निरोगी शरीरासाठी पालेभाज्या खूप महत्त्वाच्या आहेत.या भाज्यांमध्ये कॅलरीज कमी असतात. पालकाच्या ज्यूसमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट घटक असतात, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.त्याच्या सेवनाने दृष्टीही सुधारते.