Curry Leaves Water : कढीपत्ता पाणी पिणे फायदेशीर की हानिकारक? पाहा
कढीपत्ता स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणात वापरला जातो. प्रत्येक भाजीत, वरणात याचा वापर केला जातो. घरचे अनेकदा आपल्याला सांगातात की,कढीपत्ता खावा. त्यात अनेक पौष्टिक घटक असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकढीपत्ता पौष्टिक घटकांकरता ओळखला जातो. यात असणारे अँटीऑक्सीडेंटमुळे शरीरातील अनेक समस्या दूर होऊ शकतात. त्याकरता कढीपत्ता खाणे गरजेचे आहे.
कढीपत्त्याचे पाणी शरीराकरता फार फायदेशीर आहे. जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरूवात कढीपत्त्याचे पाणी पिऊन करत असाल तर त्याचे अनेक फायदे शरीराला होतात. काय आहेत या पाण्याचे फायदे जाणून घेऊयात.
निरोगी राहण्याकरता पचनसंस्था चांगली असणे गरजेचे आहे. कढीपत्त्यामध्ये काही उपयुक्त असे enzyme असतात जे पचनात मदत करतात.
सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे ताण-तणाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. स्ट्रेसची समस्या दूर करण्याकरता कढीपत्त्याचे पाणी उपयुक्त ठरते. हे पाणी पिल्याने तणाव कमी होतो.
कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सीडेंटची मात्र मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. रोज या पानांच्या पाण्याचे सेवन केले तर कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकतो. यामुळे कोणताही हृदयरोग होत नाही.
ज्या लोकांना मधूमेह आहे. त्यांनी कढीपत्त्याचे पाणी फायद्याचे ठरू शकते. ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्याकरता देखील हे फायदेशीर होऊ शकते.
कढीपत्त्याचे पाणी वजन कमी करणारे पेय म्हणून देखील वापरले जाऊ शकते, याच्या सेवनाने लठ्ठपणा कमी होतो. यामुळे केसाच्या सर्व समस्या देखील नाहीशा होतात.
कढीपत्त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हे पाणी पिल्याने तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही. बराच काळ तुम्हाला तुमचे पोट भरलेले जाणवते.
जर तुम्हाला तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर कढीपत्ता पाण्यात उकळून प्या.यामुळे तुमच्या शरीरात ताकद येते.