Manoj Jarange : 'देवा सरकारला सद्बुद्धी दे आणि मराठ्यांना लवकर आरक्षण मिळू दे' मनोज जरांगेंचे विठुरायाला साकडे

Manoj Jarange: मराठा आरक्षणाविषयी (Maratha Reservation) जनजागृती करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे.

Manoj Jarange

1/9
गुरुवारी पंढरपुरात मनोज जरांगेंची सभा पार पडली
2/9
या वेळी मनोज जरांगे यांनी विठ्ठल मंदिरात जावून विठुरायाचे दर्शन घेतले
3/9
या सरकारला सदबुद्धी द्यावी आमच्यावर अन्याय होतोय तो अन्याय दूर व्हावा आणि मराठ्यांना तातडीने आरक्षण मिळावे असे साकडे विठुरायाला घातले.
4/9
त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे शेतकऱ्यांनाही मदत देण्याची सदबुद्धी ही सरकारला विठुरायाने द्यावी, असेही ते या वेळी म्हणाले .
5/9
ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा येऊनही जरांगे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले .
6/9
शेकडो मराठा समर्थकांसह जरांगें यांना हलगीच्या कडकडाटात मंदिरापर्यंत आणले .
7/9
यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगें यांची विक्रमी एल्गार सभा पार पडली .
8/9
सरकारने दिलेला चाळीस दिवसाचा अल्टिमेट हा पाळला नाही तर मी सरकारला सोडणार नाही असा इशारा यावेळी जरांगें यांनी दिला
9/9
सोलापुरात पोहचताच मोठा हार घालून मनोज जरांगेंचं जंगी स्वागत करण्यात आलंय.
Sponsored Links by Taboola