Tulsi Water Benefits : रोज तुळशीचे पाणी प्यायल्याने शरीराला मिळतात 'हे' 6 आश्चर्यकारक फायदे
तुळशी या आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचा उपयोग फक्त चहाची चव वाढवण्यासाठीच केला जात नाही तर इतरही आरोग्यदायी फायदे मिळतात.तुळशीचे पाणी पिल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुळशीमध्ये असलेले गुणधर्म पचनास मदत करतात आणि गॅस आणि सूज कमी करतात. तुळशीचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया शांत होण्यास मदत होते आणि पचन सुधारण्यास मदत होते.
तुळशीमध्ये इम्युनोमोड्युलेटरी गुणधर्म असते. त्यामुळे ते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करू शकते. तुळशीयुक्त पाण्याचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.
तुळशीला औषधी वनस्पती मानली जाते. तुळशीचे पाणी प्यायल्याने तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते.
तुळशीमध्ये फ्लेव्होनॉइड्स, पॉलिफेनॉल आणि आवश्यक तेले यांसारखी संयुगे असतात जी अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात. हे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील हानीकारक मुक्त रॅडिकल्स तटस्थ करण्यात मदत करतात, ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होतो आणि पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते.
खोकला, सर्दी आणि दमा यांसारख्या श्वसनाच्या समस्या कमी करण्यासाठी तुळशीचा वापर पारंपारिकपणे केला जातो. तुळशीचे पाणी पिल्याने श्वसनसंस्थेवर चांगला परिणाम होतो आणि श्वसनाच्या त्रासापासून आराम मिळतो.
तुळशीमध्ये असलेल्या आवश्यक तेलांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे जळजळ आणि संबंधित लक्षणे कमी करण्यास मदत करतात.
तुळशीमध्ये सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म असतात जे तोंडाच्या संसर्गाचा सामना करण्यास आणि तोंडाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. तुळशी पाने कुस्करल्याने हिरड्या बरे होतात आणि श्वासाची दुर्गंधी कमी होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.