Asian Champions Trophy : चक दे इंडिया... भारतीय हॉकी संघाकडून मलेशियाचा पराभव, विश्वचषकावर कोरलं नाव
Hockey India beat Malaysia : भारतीय हॉकी संघाने विश्वचषकावर नाव कोरलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने मलेशियाचा 4-3 असा पराभव केला आहे.
चेन्नईच्या महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर हा अंतिम फेरीचा थरारक सामना पार पडला.
टीम इंडियाने सुरुवातीच्या हाफमध्ये 1-3 ने पिछाडीवर असताना मलेशियाचा 4-3 असा पराभव केला.
चेन्नईमध्ये शनिवारी संध्याकाळी महापौर राधाकृष्णन स्टेडियमवर झालेल्या रंजक सामन्यात भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं.
भारतीय संघाला सामन्यात गोल करण्याची अनेकदा संधी मिळाली पण सुरुवातीला संधीचं सोनं भारतीय संघाला करता आले नाही. मलेशियाने 28 व्या मिनिटाला गोल करत आघाडी घेतली.
मलेशियासाठी मोहम्मद अमिनुद्दीन याने पेनल्टी कॉर्नरवर जबरदस्त गोल केला. मलेशियाच्या आक्रमणापुढे भारतीय संघ 3-1 ने पिछाडीवर पडला होता.
भारतीय संघ चषक गमावणार अशीच स्थिती निर्माण झाली होती. पण भारताने तिसऱ्या हापमध्ये दमदार कमबॅक केलेय.
भारतीय संघ 3-2 ने पिछाडीवर होता पण अखेरच्या काही मिनिटांत भारतीय खेळाडूंनी आपला खेळ उंचावला.
अखेरच्या दोन मिनिटांत भारतीय संघाने दोन गोल करत सामना -4-3 अश फरकाने खिशात घातला.