Independence Day 2023 : दिल्लीत लाल किल्ल्यावर रंगीत तालीम!
मंगळवारी देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे.
दरम्यान, लाल किल्ल्यावर दरवर्षी पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं.
यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना उद्देशून केलेलं भाषण ऐकण्यासाठी देशभरातील अनेकांना निमंत्रित केलं जातं.
यावर्षी महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक संघटना योजनेच्या 24 लाभार्थ्यांना
15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर होणाऱ्या समारंभाला बोलावण्यात आलं आहे.
स्वातंत्र्यदिनाची देशभरात जोरदार तयारी सुरु असल्याचं पाहायला मिळतं
दिल्लीतही लाल किल्ल्यावर देखील रंगीत तालीम सुरु असल्याचं पाहायला मिळत आहेत
सरपंच, शिक्षक, शेतकरी, मच्छिमारांसह सरकारी कार्यक्रमांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तिंना निमंत्रण
त्यांच्या उपस्थितीत हा सोहोळा पार पडेल
या विशेष निमंत्रितांमध्ये व्हायब्रंट व्हिलेजेसचे सरपंच, शिक्षक, शेतकरी,मच्छिमार तसेच सेन्ट्रल व्हिस्टा प्रकल्प, अमृत सरोवर, हर घर जल या आणि अशाच इतर महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.
महाराष्ट्रात राबवण्यात येत असलेल्या शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) योजनेच्या 24 लाभार्थ्यांना नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट 2023 रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहोळ्यात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे.