Depression Cure Tips : घरबसल्या करु शकता नैराश्येवर मात, करा हे 'सहा' उपाय...
नैराश्येचा नकारात्मक परिणाम तुमच्या वैयक्तिक, व्यावसायिक जीवनावर तसेच तुमच्या नातेसंबंधांवर देखील होऊ शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनकारात्मकता आणि दुःख, एकटेपणा, निराशा आणि एकटेपणाच्या समस्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. जाणून घेऊया घरबसल्या नैराश्येमधून कसं मुक्त होऊ शकता.
आहार - तुम्हाला जर नैराश्यातून बाहेर यायचे असेल तर तुम्हाला तुमच्या आहारमध्ये बदल करण्याचा आवश्यकता आहे. जे पदार्थ तुम्हाला नैराश्येमधून बाहेर काढण्यासाठी मदत करणाऱ्या पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा.
व्यायम - दररोज सकाळी व्यायाम आणि योगा केल्याने तुम्हाला नैराश्येतीन बाहेर येण्यास मदत होऊ शकते. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम केल्याने तुम्हाला खूप बरे वाटेल.
मेडिटेशन - तुमचे मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी मेडिटेशनची मदत होऊ शकते. यामुळे तुमच्यामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होण्यास देखील मदत होईल.
झोप - नैराश्येतून बाहेर येण्यासाठी योग्य प्रमाणात झोप घेणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही नेहमी योग्य प्रमाणात झोप घ्यायला हवी.
बोलण्याचा प्रयत्न करा - डिप्रेशनमध्ये गेल्यावर एकटेपणा जाणवतो. कुणाला भेटावंसं वाटत नाही आणि बोलायवसही वाटत नाही. अशा वेळी थोडं धाडस करून बाहेर पडून तुमच्या जवळच्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न तुम्ही करु शकता.
तुमच्या आवडीचे काम - जी गोष्ट किंवा काम करायला तुम्हाला जास्त आवडते,ते काम करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला खूप बरे वाटेल आणि नकारात्मक विचार दूर होण्यास देखील मदत होईल.
हे उपाय केल्याने तुमचे नैराश्य कमी होण्यास तुम्हाला मदत होईल.