Travel Tips : जून-जुलै महिन्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? भारतातील 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या...
Tourist Places in India : जर तुम्ही जून-जुलैमध्ये फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर ही आम्ही तुमच्यासाठी यासंदर्भात माहिती घेऊन आलो आहोत.
Tourist Places in India to Visit in June-July See List
1/9
तुम्हाला निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर, तुम्हाला भारताबाहेर जाण्याची आवश्यकता नाही. भारतातच फार सुंदर अशी पर्यटनस्थळं आहेत.
2/9
भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे जून-जुलै महिन्यात आल्हाददायी वातावरण असतं आणि जिथे तुम्ही सुट्ट्यांचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.
3/9
केदारनाथ (Kedarnath) : केदारनाथला जाणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथमधील हवामान अतिशय आल्हाददायक आहे. येथे फिरण्यासाठी सध्याचा हंगाम सर्वोत्तम मानला जातो.
4/9
सेला पास (Sela Pass) : ईशान्य भारतात देखील पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहेत, त्यातीलच एक म्हणजे सेला पास. अरुणाचल प्रदेशातील तवांगपासून 78 किमी अंतरावर असलेला सेला पास अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे. तवांग आणि सेला पास हा प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. तुम्हाला सुंदर तलावाजवळ ट्रेल हायकिंग आणि पिकनिकचा आनंद घेता येईल.
5/9
दार्जिलिंग (Darjeeling) : दार्जिलिंग हा देखील पर्यटनासाठी एक उत्तम पर्याय आहे. येथे दिवसाचे तापमान 20-21 अंश आणि रात्री 12-13 अंशांवर जाते. अनेक भागात खूप थंडी असते, यातच वेगळा आनंद असतो.
6/9
कल्पा (Kalpa) : हिमाचलचा कल्पा भारतातील खास पर्यटन स्थळांपैकी एक आहे. किन्नौरमध्ये वसलेले कल्पा गाव सतलज नदीच्या काठाच्या सौंदर्याचं उत्तम उदाहरण आहे. सुंदर मठ असलेल्या मंदिरांसाठी प्रसिद्ध, या ठिकाणी येऊन तुम्ही सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. येथील सफरचंदाच्या बागाही फार प्रसिद्ध आहेत.
7/9
सोनमर्ग (Sonamarg) : तुम्ही काश्मीर पाहिलं नसेल तुम्ही संपूर्ण कुटुंबासह जून महिन्यात सोनमर्गला जाण्याचा प्लॅन करू शकता. याकाळात येथील तापमान 7-12 पर्यंत असते. येथील शिकारा बोटीची सफर खास आकर्षण आहे. यासोबत तुम्ही गोंडोला राइड, जेफ सफारी, फेमस ट्युलिप्स गार्डन, म्युझियम आणि इतर अनेक गोष्टींचा आनंद घेऊ शकता. काश्मिरी पाककृती आणि पश्मिना शालदेखील तुम्ही खरेदी करू शकता.
8/9
स्पिती व्हॅली (Spiti Valley) : स्पिती व्हॅली देखील फिरण्यासाठीच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. येथे तुम्ही चंद्रताल, सूरज ताल, धनकर मठ, कुंझुम पास अशा अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता.
9/9
भारतातील या ठिकाणांना नक्की भेट द्या...
Published at : 18 Jun 2023 12:54 PM (IST)