Woman Health Tips : नोकरदार महिलांनी फॉलो करा या 5 टिप्स आणि नेहमी फिट आणि निरोगी राहा
आजकाल स्त्रिया दुहेरी आयुष्य जगत आहेत. घर असो वा ऑफिस, सर्वच ठिकाणी स्त्रिया जबाबदाऱ्या चोख पार पाडत आहेत. त्यामुळेच सर्व महिला आपलं घर, मुलं आणि कुटुंबाची पूर्ण काळजी घेतात, पण त्यांच्याकडे स्वत:साठी वेळ नसतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशा तऱ्हेने महिलांना तणावाचा सामना करावा लागतो. मग हळूहळू त्या अनेक आजारांना बळी पडू लागतात. अशा वेळी नोकरदार महिलांना अनेकदा वेळ मिळत नाही, स्वत:ला फिट आणि निरोगी कसे ठेवता येईल, याची चिंता त्यांना सतावत असते.
स्त्रिया आपल्या मुलांना आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना नाष्टा देतात. पण नोकरी करत असल्यामुळे त्यांना स्वत:साठी नाष्टा करायला वेळ मिळत नाही. पण महिलांनीही नियमित नाष्टा करावा.
यासाठी महिला नाष्ट्यात अंडी, दूध, संपूर्ण धान्य किंवा फळे इत्यादींचे सेवन करू शकतात. महिलांनी नाष्ट्यात फायबर, प्रथिने आणि कार्बचा समावेश करावा. हे आपल्याला दिवसभर उर्जावान ठेवू शकते. जर तुम्ही नाष्टा सोडला तर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
अनेक नोकरदार महिलांना कामाच्या व्यापामुळे दुपारचे जेवण करता येत नाही. अशावेळी ते दुपारच्या जेवणात बाहेरचे जेवण खातात. इतकंच नाही तर महिलांना बाहेरचे स्नॅक्स खायला ही आवडतात.
भूक लागल्यावर त्या ऑफिसच्या आजूबाजूला मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचे सेवन करू लागतात. पण जर तुम्ही नियमितपणे बाहेरचे अन्न म्हणजेच जंक फूडचे सेवन करत असाल तर यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. खरं तर, जंक फूडमध्ये पोषक तत्वे कमी असतात, त्यात चरबी आणि कार्ब जास्त असतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
अनेकदा महिला ऑफिसमध्ये जाऊन आपल्या सीटवर बसतात. यानंतर ते फक्त दुपारच्या जेवणासाठी किंवा पाण्यासाठी उठतात. यामुळे त्यांना कंबर, पाय दुखी सारखे आजार होऊ शकतात.
तसेच बराच वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्यास इतरही समस्या वाढू शकतात. त्यामुळे ऑफिसमध्ये थोडे थोडे ब्रेक घेत राहावे. दर तासाला ५ मिनिटांचा ब्रेक घ्या आणि चालत जा. तुम्हाला हवं असेल तर खुर्चीबारमध्ये बसून हलका व्यायामही करू शकता. विश्रांती घेतल्याने तुम्हाला ऊर्जावान वाटेल, तसेच निरोगीही राहाल.
जर तुम्ही दररोज पुरेसे पाणी पित असाल तर ते तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने एक चांगले पाऊल आहे. ऑफिसमध्ये काम करताना अनेक महिला पाणी पिणं विसरतात. अशावेळी त्यांना डिहायड्रेशनला सामोरे जावे लागू शकते. यामुळे महिलांना डोकेदुखी, पचनाशी संबंधित समस्यांनी त्रस्त राहावे लागते. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी दररोज ऑफिसमध्ये पुरेसे पाणी प्यावे.
टीप : तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी नोकरदार महिलांनी आपल्या जीवनशैलीत व्यायाम किंवा योगाचा ही समावेश केला पाहिजे. कारण शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण शारीरिकरित्या सक्रिय असता तेव्हा आपल्याला नेहमीच निरोगी वाटू शकते. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारेल. लवचिकताही वाढेल. योगा आणि व्यायाम करून तुम्ही गंभीर आजारांपासूनही स्वत:चे रक्षण करू शकता.