Sleepy Feeling In Winter: हिवाळ्यात थंडीमुळे जास्त वेळ झोप का लागते? चूक, जाणून घ्या खरं कारण
बऱ्याच लोकांना वेळा थंडीमुळे अंथरुणावरुन उठावसं वाटत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळ्यात सकाळी लवकर उठायला अनेक लोक कंटाळा करतात. हिवाळ्यात जास्त झोप का लागते? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल.
हिवाळ्यात थंडी वाजते म्हणून जास्त झोप येते, तर हे चुकीचं आहे.
ऋतूनुसार आपल्या झोपण्याच्या सवयी बदलतात. बदलत्या ऋतूमुळे तापमानातही बदल होतो आणि झोपेचा कालावधीही वाढतो.
आपले शरीर नैसर्गिकरित्या मेलाटोनिन तयार करते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेत होणारा बदल मेलाटोनिनच्या पातळीवर परिणाम करतो.
मेलाटोनिन (Melatonin) हा शरीरातील एक हार्मोन आहे, जो शरीरातील पाइनल ग्रंथीमधून बाहेर पडतो.
या हार्मोनमुळे हिवाळ्यात जास्त झोप येते.
पाइनल ग्रंथी मेंदूमध्ये असते. जेव्हा मेलाटोनिन नावाचा हा हार्मोन बाहेर पडतो तेव्हा आपल्याला झोप येऊ लागते.
हिवाळ्यात उन्ह कमी असते. त्यामुळे मेलाटोनिनचे सप्रेशन उन्हाळ्यामध्ये जितके होते, तितके होत नाही.
व्यायामाचा अभाव, अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी, खराब जीवनशैली, सूर्यप्रकाशाचा अभाव, कमकुवत प्रतिकारशक्ती आणि सर्दी आणि फ्लूसारखे आजार ही देखील हिवाळ्यात (Winter) जास्त झोप येण्याची काही कारणे आहेत.